Sanjay Raut, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Badlapur News : 'आंदोलक बदलापूरचेच!' रिमांड कॉपीचा फोटो दाखवत राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, "मंत्रिमंडळात काय लायकीची…"

Sanjay Raut On Devendra Fadnavis About Badlapur Rape Case : "बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलनातील सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत, मात्र ते भाडोत्री असल्याचं तुमचे नेते सांगत होते. देवेंद्र फडणवीसजी आपल्या मंत्रिमंडळात काय लायकीची माणसं आहेत."

Jagdish Patil

Badlapur School Case : बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलनातील सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत, मात्र ते भाडोत्री असल्याचं तुमचे नेते सांगत होते. देवेंद्र फडणवीसजी आपल्या मंत्रीमंडळात काय लायकीची माणसं आहेत, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sajay Raut) यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

बदलापुरात दोन लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापूरमधील संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅक रोखून धरला. शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. या आंदोलनामुळे दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. आरोपीला फाशी द्या ही एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली होती.

सरकारने दिलेली आश्वासन आणि खुद्द सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली तरीही आंदोलक मागे हटले नाहीत. त्यामुळे अखेर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. मात्र यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली.

या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सत्ताधारी पक्षातल नेत्यांनी हे आंदोलन विरोधकांचे कटकारस्थान असल्याचं म्हटलं होतं. खुद्द मख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) देखील असं वक्तव्य केलं. बदलापूरमधील आंदोलन हे विरोधकांचे कटकारस्थान होतं. चिमुरडींवर झालेला अत्याचार ही खेदजनक बाब आहे.

पण हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं. या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. तर गाड्या भरून या ठिकाणी काही आंदोलनकर्ते आले होते. त्यांना सरकारची बदनामी करायची होती, असा आरोप त्यांनी केला होता. तर गिरीश महाजन यांनी देखल असंच वक्तव्य केलं होतं.

सरकारला बदनामी करायचा हा डाव असल्याचा सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा दावा आता संजय राऊतांनी मोडीत काढला आहे. त्यांनी आता थेट पोलिस रिमांड अ‍ॅप्लिकेशनचा फोटो ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसजी उघडा डोळे बघा नीट

ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, "देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) उघडा डोळे बघा नीट' बदलापूर आंदोलकांचे हे पोलिस रिमांड अ‍ॅप्लिकेशन आहे. सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत. आपले मंत्री सांगत होते आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत. काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात आहेत." अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सुमोटो याचिका करून घेतली दाखल करुन घेतली आहे. त्यावर आज गुरुवारी (ता.22 ऑगस्ट) रोजी सकाळी याप्रकरणाची तातडीची सुनावणी होणार आहे. तर बदलापूरमधील अत्याच्याराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT