Rahul Gandhi News : 'पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर आता महाराष्ट्रातही..' ; बदलापूरच्या घटनेवर राहुल गांधींचा संताप!

Rahul Gandhi on Badlapur Case : 'आता FIR नोंदवण्यासाठीही आंदोलनं करावी लागतील का?' असा संतप्त सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi angry over Badlapur incident : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे पोलिसांनी याप्रकरणात घेतलेली दिरंगाईची भूमिका ही नागरिकांच्या संतापास कारणीभूत ठरली. या गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ फाशी द्यावी अशी मागणीत करत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. रेल्वे वाहतूक थांबवली आणि मग सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र तोपर्यंत नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक नागरिकांवर लाठीमार करावा लागला.

मात्र या घटनेवरून आता राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. विरोधकांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर सडकून टीका सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले, 'पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर आता महाराष्ट्रातही मुलींविरोधातील लाजिरवाणे गुन्हे, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करायला भाग पाडतात? बदलापुरात दोन निरपरांधांवर घडलेल्या गुन्ह्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिलं पाऊल तोपर्यंत उचललं गेलं नाही, जोपर्यंत जनता न्यायासाठी मागणी करत रस्त्यावर उतरली नाही.'

Rahul Gandhi
Badlapur School Crime Case : बदलापुरातील घटनेनंतर उज्ज्वल निकम यांची 'POCSO' आणि 'शक्ती'वर मोठी प्रतिक्रिया

याशिवाय 'आता FIR नोंदवण्यासाठीही आंदोलनं करावी लागतील का? अखेर पीडितांसाठी पोलिस स्टेशनला जाणंही एवढं अवघड का झालं? न्याय मिळवून देण्यापेक्षाही जास्त प्रयत्न गुन्हे लपवण्यासाठी केले जात आहेत. ज्याचे सर्वात मोठे बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक ठरत असतात. FIRची नोंद न होणे हे केवळ पीडितेला निराशच करत नाही, तर गुन्हेगारांची हिंमत वाढवते.' असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
Badlapur News : बदलापूरमधील परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली, पण पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे जखमी

'सर्व सरकारं, नागरिक आणि राजकीय पक्षांना गंभीर मंथन करावे लागेल, की समजाता महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी काय पावलं उचलली जावीत. न्याय प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर राहू शकत नाही.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com