Sanjay  Raut
Sanjay Raut  
मुंबई

शाहरुखला ट्रोल करणारे नालायक, बेशरम; संजय राऊत भडकले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. बॉलिवड अभिनेता शाहरुख खानही (Shahrukh Khan) यावेळी उपस्थित होता.

शाहरुखने लतादीदींचे अंत्यदर्शन घेत असताना दुवा मागितली. मात्र त्याच्या दुवा मागण्याच्या पद्धतीवरुन अनेक जणांनी शाहरुखला ट्रोल केले आहे. या ट्रोल करणाऱ्यांचा शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

"शाहरुख खानने दीदींना श्रद्धांजली वाहताना दुवा केली तो थुंकला नाही, शाहरुखवर टीका करणारे एकाच गटाचे आणि एकाच परिवाराचे आहेत. शाहरुखला ट्रोल करणाऱ्यांचा मी निषेध करतो. हे जे कोणी लोक आहेत त्यांना थोडीही लाज राहिली नाही. जे अशा दुःखद प्रसंगाचेही जात, धर्मावरुन राजकारण करत आहेत. ते बेशरम, नालायक लोक आहेत. एका महान कलाकाराच्या मृत्यूनंतर दूसऱ्या कलाकाराला ट्रोल करणे, बदनामी करणे यांना विद्वेषापलीकडे यांना काही सूचत नाही, यांनीच देशाची वाट लावली,'' असेही राऊत म्हणाले.

मी सतत लतादीदींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होतो. म्हणून त्यांचे निधन झाल्यावर सर्वात आधी मी ट्विट केले. लता दीदी यांच्या रुपाने साक्षात सरस्वतीने या जमिनीवर जन्म घेतला. लतादीदींच्या रुपाने त्या महाराष्ट्रात वावरल्या, त्या भूतलावरचा आत्मा नव्हताच. जिथून त्या आल्या आणि त्या शरीराने आपल्यातून निघून गेल्या. परंतु त्यांचा आत्मा, गाणे आणि संगीत इथेच आहे. जो पर्यंत सुर्य-चंद्र आहे तोपर्यंत त्यांचा आवाज या भुतलावर घुमत राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक बनवण्याची मागणी करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे. लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको, असं म्हणत संजय राऊत यांनी राम कदम यांच्या मागणीला विरोध केला आहे. काहींनी शिवाजीपार्कवर लतादीदींच स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी केली. पण त्यांनी मागणी करण्याची गरज नाही, यावर राजकारण करू नका. लतादीदींच्या स्मारकाबाबत देशाने विचार करायला हवा. लतादीदी राजकारणी नव्हत्या. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही त्यांच स्मृतीस्थळ उभारण्याचा विचार करावा लागेल,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT