योगींसह भाजप नेत्यांवर बॅाम्ब हल्ल्याची धमकी ; लेडी डॅानच्या टि्वटमुळं खळबळ

गोरखपूर मंदिर परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश सरकारकडून अनेक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहेत.
Yogi Adityanath
Yogi Adityanathsarkarnama
Published on
Updated on

लखनैा : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एका टि्वटमुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह भाजप नेत्यांना उडविण्याची धमकी देण्यात आल्याने उत्तरप्रदेशात राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. लेडी डॅान (lady don) नावाच्या टि्वट हॅडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांना टॅग करण्यात आले आहे.

टि्वटरच्या माध्यमातून मेरठ, लखनैा येथे बॅाम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. या टि्वटनंतर पोलिसांचे पथक तपास करीत आहेत. सायबर सेलच्या टीमला याबाबत तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ''ओवैसी तो मोहरा है, असली निशाना तो योगी,'' असे टि्वटमध्ये म्हटलं आहे.

मेरठसह दहा ठिकाणी बॅाम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. ''भाजप नेत्यांच्या गाड्यावर आरडीएक्सने हल्ला करण्यात येणार आहे. आपले पथक पाठवा, दिल्लीकडे पाहू नका. योगी यांना मारण्यात येईल,'' अशी धमकी देण्यात आली आहे.

Yogi Adityanath
फडणवीसांबाबत न बोलणचं बरं, तिखट प्रतिक्रिया येतात ; खडसेंचा सावध पवित्रा

हापुड़चे पोलिस उपायुक्त दीपक भुकर म्हणाले, ''लेडी डॅान नावाच्या टि्वटर हॅडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. त्यांनी तीन टि्वट केले आहेत. या टि्वटरवरुन यापूर्वी धमकी देण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोरखनाथ मंदिर, लखनैा विधानसभा. मेरठ आदी ठिकाणी बॅाम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.

Yogi Adityanath
शिवसेनेचा हल्ला पूर्वनियोजित ; सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल

त्यानंतर गोरखपूर मंदिर परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश सरकारकडून अनेक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहेत. गोरखनाथ मंदिर परिसरात तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. पण सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com