sanjay raut, ajit pawar Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: 'सोम्या-गोम्या'वरून अजितदादा-राऊतांमध्ये जुंपली; इतके नामर्द...

Maharashtra Politics: 2024 ला कळेलच सोम्या-गोम्या कोण आहेत...

Mangesh Mahale

Mumbai News: अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय राऊत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'आक्रोश मोर्चा'मध्ये खासदार संजय राऊतांनी अजित पवारांची नक्कल करीत टीकास्त्र डागले होते. त्याला अजितदादांनी उत्तर न देताच 'कुणा सोम्या-गोम्यावर मी बोलत नाही,' असे म्हणत राऊतांना फटकारलं आहे. राऊतांनी अजितदादांना सुनावत 'त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत' असा टोला हाणला.

राऊत म्हणाले, '2024 ला कळेलच सोम्या-गोम्या कोण आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे आणि जे डरपोक आहेत, त्यांनी आमच्यावर बोलू नये. यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय. मुंबईतले उद्योग गुजरातला पळवले जात असताना, फक्त आम्ही तुरुंगात जाऊ, बोललो तर या भयाने जे लटपटताहेत ते काय आमच्यावर बोलणार? त्यांनी आमच्यावर बोलू नये. त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत.'

'राज्यातील रोजगार, उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकारमधले हौसे, नवसे आणि गवसे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना कुणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतके नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या इतिहासात झाले नाहीत,' अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली.

काय म्हणाले होते संजय राऊत?

मी एक वक्तव्य ऐकलं, ‘काहीही झाले तरी मी तुम्हाला पाडणारच… पण, आमच्या पाडापाडीच्या खेळात पडलात, तर पहिले तुम्ही पडाल. नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे. ‘हवा बहोत तेज चल रही है, अजितराव... टोपी उड जाएगी.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT