Ravikant Tupkar: तुपकराचं ठरलं; संसदेत जाणारच; 'एक व्होट आणि एक नोट' तत्वावर बुलढाण्यातून लढणार

Buldana News : मी 100 टक्के संसदेत जाणारच...
Ravikant Tupka
Ravikant TupkaSarkarnama
Published on
Updated on

Buldana: शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलढाणा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहे. 'दिल्ली दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारसुद्धा,' असा विश्वास तुपकरांनी व्यक्त केला आहे. लोकवर्गणीतून ते निवडणूक लढणार आहेत.

'मी गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करत आहे. त्यामुळे मी 100 टक्के संसदेत जाणार, ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाचं मूळ दिल्लीत असल्यानं सगळ्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जायला पाहिजे अन् सरकारला आमचे प्रश्न सोडवायला भाग पाडलं पाहिजे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक मी लोकसहभागाने आणि लोकवर्गणीतून लढणार आहे,' असे तुपकरांनी स्पष्ट केलं.

Ravikant Tupka
Arvind Panagariya: नीति आयागाचे माजी उपाध्यक्ष झाले वित्त आयोगाचे प्रमुख; कोण आहेत अरविंद पनगढिया?

'मी फाटका माणूस आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत, त्यामुळे 'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर मी निवडणूक लढणार आहे. बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा असल्याचे बोलले जाते. मला हा कलंक पुसायचा आहे. कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळवून देणे हे माझं पहिलं काम असेल. नवीन शिक्षण प्रणाली आणणे आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सभागृहात मी हे विषय मांडणार,'असे तुपकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढणार का? यावर तुपकर म्हणाले, 'प्रत्येक निवडणुकीत सहा जागा लढवण्याची घोषणा राजू शेट्टी नेहमीच करतात. यावेळी माझ्या भागातील शेतकऱ्यांचा निर्णय आहे की, लढायचं आणि तेही स्वतंत्र. माझं न्यायालय शेतकरी आहे,'

Ravikant Tupka
Madha Lok Sabha: निंबाळकर की मोहिते पाटील? फडणवीस सोडवणार माढ्याचा तिढा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com