Rebel MPs Mumbai Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : मुंबई विमानतळावर चार खासदार उतरले अन् भेदरलेल्या नजरेने..! संजय राऊत काय-काय म्हणाले?

Shiv Sena UBT, Rebel MPs Mumbai : फुटीर खासदारांकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजते. या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही.

Rajanand More

Shiv Sena Crisis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा फुटीर खासदार सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यापैकी चार खासदार मुंबईत दाखल झाले आहे. ते शिंदेंच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी असल्याचे समजते. काही तासांतच ते अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेशाची घोषणा करू शकता. दरम्यान, या घडामोडींवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 50-50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने सशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे.

ह्यांची पुढील पिढी सांगेल, मेरा बाप गद्दार था, मेरा पती गद्दार था, मेरा नाना गद्दार था, अशी शब्दांत राऊतांनी टीका केली आहे. राऊत यांनी यापूर्वीही सहा खासदारांचा चांगलाच समाचार घेतला होता. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या तोंडून अपशब्द गेले होते. त्यावरून बरीच टीकाही झाली. फुटीर खासदार ओम राजेनिंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यावरून नाराजीही व्यक्त केली होती.

दरम्यान, फुटीर खासदारांकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजते. या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश आजच होणार असल्याची माहिती आहे. ओमराजे हे दिल्लीला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. तर संजय दिना पाटील हे मुंबईतच आहेत. तेही नंदनवन निवासस्थानी पोहचणार असल्याचे समजते.

ओमराजेंनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विकास आणि निधीसाठी आपण सत्तेतील शिवसेनेत जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आष्टीकर हेही विकासासाठी सत्तेत जाणार आहे. अन्य चार खासदारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे खासदार काय बोलणार, याबबात उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT