Rahul Gandhi News : भाऊबंदकी सुरू; राहुल गांधींना मिळाला नवा 'भाऊ', पण दगाफटका होण्याची धास्ती...

Vijay Politics, MK Stalin, Congress Tamil Nadu : काँग्रेसच्या या भूमिकेमुळे स्टॅलिन चांगलेच भडकले. काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगत डीएमकेकडून सर्व राजकीय संबंध तोडण्यात आले.
Rahul Gandhi new political alliance update
Rahul Gandhi new political alliance updateSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi strategy : राजकारणातील भाऊबंदकी नवी नाही. कुटुंबात मालमत्तेसाठी जसा कलह होतो, तसा कलह राजकारणातही सत्तेसाठी असतो. सत्ता असेल तर सगळे गोडीगुलाबीने राहतात.

सत्ता गेली की लगेच वादविवाद सुरू. असे काहीसे तमिळनाडूतही घडले आहे. मागील काही वर्षांपासून माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक आणि काँग्रेसची राज्यात आघाडी होती. पाच वर्षे ही आघाडी सत्तेत होती. पण सत्ता जाताच भाऊबंदकी सुरू झाली आहे.

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत टीव्हीके पक्षाने आश्चर्यकारक विजय मिळवत सत्ता काबीज केली. मात्र, बहुमतासाठी आकडे जुळत नसल्याने काही तासांतच काँग्रेसने मदतीचा पहिला हात पुढे केला. पक्षाच्या पाच आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ डीएमके आघाडीतील इतर छोटे पक्षही विजय यांच्यासोबत आले. स्टॅलिन यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.

भाऊबंदकी सुरू

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे स्टॅलिन चांगलेच भडकले. काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगत डीएमकेकडून सर्व राजकीय संबंध तोडण्यात आले. पक्षाने लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्षाच्या खासदारांची बसण्यासाठी जागा बदलण्याची विनंती केली. इंडिया आघाडीतून डीएमके बाहेर पडली नसली तरी जिथे काँग्रेस तिथे बैठकही न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षातील नेत्यांची मने चांगलीच दुरावली आहेत.

Rahul Gandhi new political alliance update
Operation Tiger : मोठी बातमी : अखेर बंडखोर खासदाराकडूनच 'ऑपरेशन टायगर'वर शिक्कामोर्तब; शिवसेनेत गेल्याचे केलं जाहीर...

एवढेच नव्हे तर स्टॅलिन आणि राहुल गांधी यांच्यातही दुरावा वाढला आहे. स्टॅलिन हे नेहमीच राहुल गांधी यांना बंधू (ब्रदर) म्हणायचे. भावी पंतप्रधान मानायचे. पण आघाडी तुटताच हे मानलेलं नातंही तुटलं आहे. राहुल यांचा नुकताच वाढदिवस झाला. स्टॅलिन यांनी सोशल मीडियातून त्यांना शुभेच्छाही दिल्या. पण ती केवळ औपचारिकता असल्याचे त्यांचे पोस्टवरून स्पष्ट झाले. या पोस्टमध्ये 'ब्रदर' हा उल्लेख टाळण्यात आला.

स्टॅलिन यांच्या या पोस्टला प्रतिसाद देताना राहुल यांनीही ब्रदर या शब्दाचा उल्लेख टाळला. यापूर्वी स्टॅलिन यांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये अनेकदा तसा उल्लेख असायचा. त्यामुळे स्टॅलिन आणि राहुल गांधींमध्ये राजकीय भाऊबंदकी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, राजकारणातील एक भाऊ सोडून गेला असला तरी राहुल यांना दुसरा भाऊ मिळाला आहे.

Rahul Gandhi new political alliance update
Shiv Sena UBT Crisis : खासदार वडिलांनी ठाकरेंना सोडलं, 'फादर्स डे'दिवशीच 'मातोश्री' गाठणारी लेक कोण?

राहुल गांधींचा नवा 'ब्रदर'

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा 'ब्रदर' असा उल्लेख केला होता. त्यामुळे स्टॅलिन सोडून गेले असले तरी विजय यांच्या रुपाने राहुल यांना तामिळनाडूत नवा भाऊ मिळाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसने सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला होता. त्याची परतफेडही विजय यांनी राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडत काही दिवसांतच केली. काँग्रेसला मंत्रिमंडळात महत्वाचे स्थान दिले. आणि आता राहुल यांचा उल्लेख 'ब्रदर' असा करत यापुढे राजकारणात एकत्रितपणे पुढे जाण्याचा संदेश दिला आहे.

धास्ती कायम

राहुल यांना नवा भाऊ मिळाला असला तरी भाऊबंदकीमध्ये स्टॅलिन आपल्याला दगाफटका तर करणार नाहीत ना, अशी धास्ती निश्चितच काँग्रेसला असणार. द्रमुकचे लोकसभेत २२ खासदार आहे. लोकसभेत मतदानाला येणाऱ्या विधेयकांवर द्रमुकची भूमिका निर्णायक ठरू शकते. सध्या भाजपकडून दोन तृतियांशचा आकडा गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. या जाळ्यात द्रमुक अडकणार तर नाही, अशी भीती काँग्रेसला नक्कीच असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com