Sanjay-Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Threat: संजय राऊत यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी! घराबाहेरील गाडीवर लिहिला संदेश

Sanjay Raut Threat: पोलिसांना या घटनेची माहिती कळताच तात्काळ ते संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहेत.

Amit Ujagare

Sanjay Raut Threat: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर एकानं हा धमकीचा संदेश लिहिला होता. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच तात्काळ ते संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांनी राऊत कुटुंबियांची प्राथमिक चौकशी केली.

कारवर लिहिला संदेश

संजय राऊत यांच्या भांडूप येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर उभी असलेली 'वॅगन आर' कार बऱ्याच दिवसापासून एकाच जागी उभी आहे. त्यामुळं या कारवर बरीच धूळही बसली आहे. या धूळ बसलेल्या काचेवर कोणीतरी संजय राऊत यांना धमकी देणारा संदेश लिहिला आहे. 'आज हंगामा होगा! आज रात १२.०० am बॉम्ब ब्लास्ट होगा' असं या संदेशात म्हटलं आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर सर्वात आधी राऊत यांच्या सहकाऱ्यांनी याचे फोटो काढले आणि ते पोलिसांना पाठवले. त्यानंतर पोलीस बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी याची पडताळणी केली.

पोलिसांचा तपास सुरु

दरम्यान, हा धमकीचा संदेश स्पष्टपणे दिसत असल्यानं पोलिसांनी खबरदारी म्हणून प्राथमिक तपास सुरु केला आहे. हा संदेश हिंदीत लिहिला असल्यानं ते लिहिणारी व्यक्ती कोण असेल? याचा तपास केला जात आहे. पण हे कोणी लिहिलं? कशासाठी लिहिलं? याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण एकतर मुंबईत निवडणुकांचं वातावरण त्यात आज ३१ डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवसानिमित्त सर्वत्र सेलिब्रेशनचा माहोल असल्यानं पोलिसही विशेष काळजी घेत आहेत.

यापूर्वी झाली होती रेकी

यापूर्वीही संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्याबाहेर काही अज्ञात लोकांनी बाईकवरुन येऊन बंगल्याचे फोटो काढून रेकी होती. दहा मोबाईल कॅमेऱ्यांमधून ही रेकी करण्यात आली होती. या घटनेचे सीसीटीव्ही देखील समोर आले होते. विशेष म्हणजे या प्रकाराची चर्चा विधानसभेतही झाली होती. पण त्याचवेळी राऊतांच्या घराबाहेर असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते बाईकवरुन फरार झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT