Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क इथं सुरु आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी देशातील रिजीम बदलाचा अर्थात सत्ता बदलाचा पुनरुच्चार केला. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेतून पायउतार होणार असल्याचं सांगताना याची थेट तारीखही त्यांनी सांगितली.
संजय राऊत म्हणाले, "ज्या राम मंदिरासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आंदोलनात सहभागी झालो. आम्ही सगळ्यांनी रस्त सांडलं, गोळ्या झेलल्या हे राम मंदिर जेव्हा उभं राहिलं. तेव्हा त्या राम मंदिरात या भाजपच्या चोरांनी, डाकूंनी १४०० कोटी रुपयांची लूट केली. सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन दान पेट्या, अलंकार, पादुका, सीतामाईची कर्णफुलं चोरली. सीतामाईला भेट दिलेली २७ मंगळसुत्र चोरीला केली. कुठल्या मुहु्र्तावर तुम्ही राम मंदिराची उभारणी केली? आता मी तुम्हाला तुमचा मुहुर्त सांगतो तुम्ही कधी जाणार आहात. मोदी जाणार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. तुम्ही लिहून ठेवा, आता मोदी आणि शहा दोघेही राहणार नाहीत.
अल्बेनिया नावाच्या देशात लोकांनी सुप्रीम कोर्ट जाळलं, हे सुप्रीम कोर्ट का जाळलं तर तिथल्या भ्रष्ट पंतप्रधानाच्या पाठिशी तिकडलं सुप्रीम कोर्ट उभं राहिलं. लोक चिडले लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी आग लावली. इटली, फ्रान्स, बेल्जिअममध्ये लोक रस्त्यावर आहेत. तसंच भारतातही लोक रस्त्यावर आहेत. आता मोदी-शहांना लोक घाबरत नाही, असंही यावेळी राऊत म्हणाले.
या देशात विद्यार्थी नाराज आहेत ते रस्त्यावर आहेत. या ठिकाणी मध्यमवर्गीय रस्त्यावर आहेत, शिक्षक रस्त्यावर आहेत, शेतकरी आत्महत्या करतंय ते देखील रस्त्यावर आहे, महिलाही देखील रस्त्यावर आहेत. मोदी विरोधामध्ये इतकं प्रचंड जनमत असताना यांना मतं देतंय कोण? तर यांना मत देतोय ग्यानू आणि ज्ञानू. त्या ग्यानूला जावं लागेल, हे भ्रष्ट सरकार आपल्याला उलथवून टाकावं लागेल. हे रिजिम आपल्याला बदलावं लागेल आणि त्यासाठी हा शिवसेनेचे आजचा मेळावा होतोय. त्यामुळं आम्ही आता कोणाकडं याचना करणार नाही.
आता याचना नाही रण होगा, छातीवर गोळ्या झेलू पण या देशात तिरंगा फडकवण्यावर बंदी आणणाऱ्या सरकारला आम्ही कायमच तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बंडाला सुरुवात झाली आहे, हे जनतेचं बंड आहे. या बंडाचे सेनापती उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दांत संजय राऊतांनी मोदी-शहांवर घणाघात केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.