

Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. हल्लेखारांचा टायगर हा टार्गेटच नव्हता तर दुसराच सेलिब्रेटी त्यांच्या टार्गेटवर होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे, असं सध्या माध्यमांतील सुत्रांच्या हवाल्यानं कळतं आहे. पण हल्लेखोरांना नेमकं कोणाला टार्गेट करायचं होतं? पण मग त्यांनी टायगरला का टार्गेट केलं? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
माध्यमांतील वृत्तांनुसार, हल्लेखारांचं टायगर श्रॉफ हे मुख्य लक्ष्य नव्हतं, दुसऱ्याच सेलिब्रेटीला लक्ष्य करताना हा हल्ला झाला होता. पण मुख्य टार्गेटपर्यंत पोहोचता न आल्यानं हल्लेखोरांनी टायगरला लक्ष्य केलं. यामध्ये टायगर श्रॉफला पोलीस सुरक्षा नसल्याची माहिती त्याच्या चाहत्याच्या रील्समधून हल्लेखोरांना मिळाली होती. त्यामुळं बॉलिवूडमध्ये एक दहशत निर्माण व्हावी यासाठी टायगरच्या हत्येचा कट रचला गेला, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.
दरम्यान, टायगर श्रॉफवर रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमातून जात असताना कारवर तीन तरुणांनी गोळीबार केला होता. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पण या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्विकारली होती. सलमान खानसोबत टायगर काम करत असल्यानं त्याच्यावर आम्ही हल्ला घडवून आणला असा दावा या गँगनं केला होता. कारण काळवीट शिकार प्रकरणापासून सलमानवर बिश्नोई गँगचा राग आहे.
राजस्थानात काळवीटाला बिश्नोई समाजात देवाचा दर्जा दिला जातो. त्यामुळं 'हम साथ साथ है' या १९९८ मध्ये आलेल्या सिनेमाच्या शुटींगवेळी काळवीटाची हत्या केल्यानं सलमान खानला आजही २८ वर्षानंतरही बिश्नोई समाजाच्या रोषाला समोरं जावं लागत आहे. पण आता सलमान खानसोबत काम करणाऱ्या कुठल्याही कलाकाराला आम्ही टार्गेट करणार आहोत, अशी धमकी देत बिश्नोई गँगचा बॉलिवूडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.