Sanjay raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Vs Wadettiwar : राऊतांवर वडेट्टी'वार' ; म्हणाले, 23 जागांच्या वावड्या नको..!

Sanjay Raut Vs Vijay Wadettiwar : 'प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे आणि 'इंडिया' आघाडीचे घटक असावेत, याबाबतही 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे.'

Chetan Zadpe

Mumbai News : आगामी लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 23 जागा लढवणार असा दावा केला आहे. महाराष्ट्रातील लोकसभा जागांच्या वाटपाची चर्चा दिल्लीत हायकमांडसमोर होईल, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राऊतांच्या दाव्याचे खंडन केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Marathi News)

याबाबत संजय राऊत म्हणाले, 'महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून, ती दिल्लीमध्ये होईल. हायकमांडसमोर जागावाटबाबत चर्चा होणार आहे. आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढवतोय, हे आम्ही दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे. आणि आमचे सबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांशी अतिशय चांगले आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल यांच्याशी महत्त्वाचे संबंध आहेत. आम्ही 23 जागा लढवणार हे निश्चित आहे. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे आणि 'इंडिया' आघाडीचे घटक असावेत, याबाबतही 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे.'

वडेट्टीवार यांनी केलं खंडन

मेरिटच्या निकषावर आम्ही याबाबत विचार करू. जागावाटपाबाबतचा निर्णय हायकमांड घेणार आहे. हा राज्यस्तरावरचा विषय नाही. आमचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. याबाबत चर्चाच झाली नाही आणि जागावाटपाचा निर्णय झालाच नाही. हा काहीतरी वावड्या उठवून विरोधकांमध्ये भांडणं लावायचा हा प्रकार आहे, या शब्दांत काँग्रसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राऊत यांचा दावा फेटाळला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT