NCP News : कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का; तीन टर्म आमदार राहिलेल्या 'या' बड्या नेत्यानं धरली भाजपची वाट

NCP Leader Join BJP : अजित पवारांच्या बंडावेळी त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
NCP News
NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

Karjat-Khalapur : कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे रोवण्यात सुनील तटकरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तटकरे यांनी राष्ट्रवादीत संघटनात्मक पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.पण त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटासोबत महायुती सरकारमध्ये जाणं पसंत केले. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या विश्वासू शिलेदाराने भाजपची वाट धरली आहे. हा तटकरेंसोबत शरद पवार गटासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले सुरेश लाड (Suresh Lad) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याची बोलले जात होते. तसेच लवकरच ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही जोर आला होता. आता लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

NCP News
Maratha Reservation : RSS चा विरोध झुगारत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली मोठी मागणी, म्हणाले, " जातनिहाय जनगणना..."

लाड यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र थोरवे (Mahendra Thorave) यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीत फारसे सक्रिय नव्हते. या मतदारसंघात सुधाकर घारे यांचे वाढते वर्चस्व आणि पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे ते अस्वस्थ होते. खासदार तटकरेंनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले होते. अजित पवारांच्या बंडावेळी त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. एकीकडे पवार गटाच्या सहभागानंतर महायुती आणखी भरभक्कम झाल्याचा दावा करत लोकसभेला महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याच्या निर्धारालाही मोठे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण एकीकडे हे सगळं वातावरण महायुतीतील भाजप-शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटांमध्ये आगामी निवडणुकांमुळे काहीशी अस्वस्थता आहे. तसेच एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी या पक्षांकडून सोडली जात नाही.

आता सुरेश लाड भाजपमध्ये आल्याने कर्जत-खालापूर मतदारसंघातील भाजपला मोठे बळ मिळाले आहे. या मतदारसंघातील भाजपची दिवसागणिक वाढणारी ताकद शिवसेना आणि आमदार महेंद्र थोरवेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही ही जागा मिळवण्यासाठी आग्रही आहे. राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी तटकरेंसह स्वत:ची ताकद वापरुन मतदारसंघात निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा कस लागणार हे निश्चित आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

NCP News
Nitin Gadkari News : गोंधळ घालणाऱ्या खासदारांना नितीन गडकरींनी करुन दिली अटल बिहारी वाजपेयींची आठवण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com