Nitesh Rane vs Sanjay Raut
Nitesh Rane vs Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane vs Sanjay Raut: ''2019 ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं; पण ठाकरेंनी...; राणेंचा मोठा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी रोज नित्यनेमानं सकाळी पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत असतात. भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या इशार्यांनंतरही राऊतांच्या पत्रकार परिषदा सुरुच राहिल्यानं अखेर भाजपनं राऊतांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याची जबाबदारी आमदार नितेश राणेंवर सोपवली. तेव्हापासून राणेंनी राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर देणं सुरु आहे. आता नितेश राणेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नितेश राणें(Nitesh Rane)नी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राऊत, ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला. राणे म्हणाले, 2019ला मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता. शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊत यांचं नाव उद्धव ठाकरेंकडे सूचवलं होतं. राऊतांना मुख्यमंत्री करा म्हणून सांगितलं होतं. पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळच होतं. त्यांनी राऊतांचं नाव नाकारलं. तेव्हापासून राऊत यांची नाटकं आणि षडयंत्र सुरू झाली आहेत असा धक्कादायक दावा राणे यांनी केला आहे.

हे राऊतांचे पहिल्यापासून धंदे ...

राणे म्हणाले, कोणाचे बाप काढायचे, भांडण लावायचे, भावा भावात वाद लावायचे हे पहिल्यापासूनच संजय राऊतां(Sanjay Raut)चे धंदे आहेत. पवार कुटुंबियातही भांडणे लावण्याचे काम त्याने सुरू केले आहे. अजितदादांनी त्यांना खडसावले. पवार साहेबही त्यांना बोलले आहेत असंही राणे म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे? असं मला महाराष्ट्राला विचारायचं आहे अशी टीकाही राणे यांनी केली.

मुख्यमंत्री होण्यासाठी रश्मी ठाकरेंवर दबाव..

उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या आईवर दबाव आणला होता. जोपर्यंत माझं नाव पुकारलं जात नाही तोपर्यंत दाओस मधून येणार नाही असं म्हणाला होता. दावोसच्या नावाखाली आदित्य ठाकरे लंडनला होते असा खुलासाही राणेंनी केला.

ठाकरेंसोबतच्या 'त्या' सर्वांची चौकशी करा...

बारसू प्रकल्पावरुन एखीकडे राज्यात रान उठले आहे. याचदरम्यान, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) आता बारसूला जाणार असल्याची चर्चा आहे.या बारसू दौऱ्यावरुन नितेश राणेंनी आक्रमक झाले आहे.

राणे म्हणाले,उद्धव ठाकरे बारसूला येणार आहेत. त्यासाठी त्यांनी काही गुंडांना बोलावले आहे. काही गुंडांना कालपासून मेसेज जात आहेत. चला कोकणात जायचं आहे. याचा इन्कार केलात तर मी स्क्रीन शॉटसह जाहीर करेन. बारसूला येण्यासाठी तुम्हाला गुंड का लागतात? पोलिसांना विनंती करतो की. उद्धव ठाकरेंबरोबर येणाऱ्या सर्वांची चौकशी करा असंही राणे यावेळी म्हणाले आहेत.

आदित्य-तेजसमध्ये वाद लावले

आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यातही राऊत यांनी वाद लावले आहेत. 1998 ला राऊत यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा होती. तेव्हा, मला खासदारकी दिली नाही तर या बाप लेकांना (बाळासाहेब-उद्धव) पोचवतो, असं संजय राऊत म्हणाले होते. हा घरात घेण्याचे लायकीचा नाही. उद्धवजींना सांगेन, तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचे असेल तर यांना लांब ठेवा, असं ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT