Sanjay Raut Latest News Sarkarnama
मुंबई

Sanjay raut : राऊतांची 'या' प्रकरणावर SIT ची मागणी ; नागपुरात करणार मोठा गौप्यस्फोट

Sanjay raut : एसआयटीच्या चौकशीवरुन राऊत संतापले

सरकारनामा ब्युरो

Sanjay raut : सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly) रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण, दिशा सॅलियन प्रकरण, राहुल शेवाळे एसआयटी चौकशी, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट, जयंत पाटलांचे निलंबन यावरुन अधिवेशन गाजत आहे.

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे जुनी प्रकरणं उकरुन चौकशी करण्याचा सपाटा लावला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे.काही प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. एसआयटीच्या चौकशीवरुन राऊत संतापले आहेत.

"सरकारला एसआयटी (SIT) स्थापन करण्याची खाज, खाजू दे, आधी 50 खोक्यांसाठी SIT स्थापन करा," अशा शब्दात संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "सरकारला एसआयटी स्थापन करण्याची फार खाज आहे, खाजवत बसू दे," अशी टीका राऊतांनी केली आहे.

राऊत म्हणाले, "एसआयटीचं रेशनिंग केलं आहे, म्हणजे मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात सगळ्यात आधी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे, जे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 – 50 खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता, त्यावर एक एसआयटी स्थापन झाली पाहिजे,"

"जे विषय संपले आहेत, जे विषय पोलिसांनी, सीबीआयने संपवले आहेत त्यावर एसआयटी स्थापन करुन पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जाण्यास तयार आहोत. तेच तोंडावर पडतील," असे राऊत म्हणाले. आम्ही दोन दिवस नागपुरला जाणार आहे. त्यावेळी अनेक विषय समोर आणू, त्यावरही एसआयटीची मागणी करणार असल्याचे राऊतांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT