Suresh Jain : सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली : एअर अ‌ॅम्ब्युलन्समधून 'ब्रीच कँडी' मध्ये हलवले

Suresh Jain : सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
Sureshdada Jain
Sureshdada JainSarkarnama
Published on
Updated on

Suresh Jain : घरकूल घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना नुकताच नियमित जामीन मिळाला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जळगावमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, काल मध्यरात्री जैन त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मुंबईला उपचाराला हलविण्यात आले आहे.

Sureshdada Jain
Jaykumar gore : स्वतः जखमी असतानाही आमदार गोरेंनी केली आपल्या जखमी सहकाऱ्यांना मदत

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. काल (ता.२३)मध्यरात्री जैन यांना श्वास घेताना त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण काही वेळाने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने एअर अ‌ॅम्ब्युलन्समधून ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले.

सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. घरकूल घोटाळाप्रकरणी जैन यांना शिक्षा झाली होती. काही दिवसापूर्वी त्यांना जामीन मिळाला आहे. ते कारागृहातून बाहेर आल्यावर जळगाव रेल्वे स्थानकापासून ते त्यांच्या गाडीपर्यंत रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आले होते.

जैन पुन्हा राजकारणाच एन्ट्री घेतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, मात्र, आपण राजकीय संन्सास घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

Sureshdada Jain
Basavaraj Bommai : वाद मिटवायचा की पेटवायचा ? ; बोम्मईंना शिवसेनेचा इशारा

आता ते कुटुंबियांना वेळ देणार आहे. आता केवळ आशीर्वादासह मार्गदर्शकाच्याच भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. "चाळीस वर्षांत जे चांगले करता आले, ते करण्याचा प्रयत्न केला. शहराचा विकास थांबला आहे. भेटायला येणारे लोक जळगाव खड्ड्यांचे शहर झाल्याचे सांगत. त्यामुळे वाईट वाटत होते. सर्वांशी चर्चा करूनच पुढचे सर्वकाही ठरविले जाईल," असे सुरेश जैन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com