Sanjay Raut News  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: अजितदादांना राऊतांचा चिमटा; आजारी माणूसच दुसऱ्यांना भेटायला जात आहे...

Amit Shah Ajit Pawar Meeting: राज्यात आता नवी परंपरा सुरू झाली आहे.

Mangesh Mahale

Mumbai: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शाहांच्या भेटीनंतर अजितदादांना टोला लगावला आहे.

"अजितदादा आजारी असतानाही अमित शाहांना भेटले. पूर्वी आजारी माणसांना भेटायला लोक यायचे. आता राज्यात आता नवी परंपरा सुरू झाली आहे. आजारी माणूसच दुसऱ्यांना भेटायला जात आहे," असा मिश्किल टोला राऊतांनी अजितदादांना हाणला आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. काल (शुक्रवारी) अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली. खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे हेसुद्धा उपस्थित होते.

अजित पवार काल शाहांना भेटले. हा खरा तर एक विनोद आहे. जवळच्या माणसाने मला हा विनोद सांगितला. आतापर्यंत आजारी माणासाला लोक भेटायला येत होते. तशी परंपरा आहे. मी आजारी आहे, मला डेंग्यू झाला आहे, मला अंथरूनातून उठता येत नाही. मला दिवाळीत कोणी त्रास देऊ नका, मी कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही. मी खूप आजारी आहे, असे सांगण्यात येत होते, पण काल प्रथमच आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेला आहे, असा मिश्किल टोला राऊतांनी लगावला.

उद्धव ठाकरे आज दुपारी मुंब्रा येथे शिवसेना शाखेला भेट देणार आहे. यावरून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. शिंदे गट ठाकरेंना विरोध करण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलिसांवर आरोप करीत त्यांना आव्हान केलं आहे.

"पोलिस आयुक्तांना आव्हान करतो, आम्ही येत आहोत, तुम्ही आम्हाला अडवून दाखवा," असे सांगत राऊतांनी दंड थोपटले आहे. उद्धव ठाकरे यांना येण्यापासून पोलिस रोखत आहे. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आहेत. त्यांना तडीपार करण्याची धमकी दिली आहे. पोलिसांसमोर ठाकरेंचे बॅनर फाडले आहेत. जे आता आम्हाला आडवत आहेत, ते ज्यावेळी शाखा तोडत होते, तेव्हा कुठे होते, असा सवाल राऊतांनी पोलिसांना केला आहे. "जे पोलिस शिंदे सरकारची चाकरी करीत आहेत, त्यांना एवढंच सांगतो की 31 तारखेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार नाहीत," असे राऊतांनी ठामपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT