Ajit Pawar- Sanjay Shirsat Sarkarnama
मुंबई

Sanjay Shirsat on Ajitdada's CM: अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदावर शिरसाटांचा गर्भित इशारा; ‘त्यामुळे पवारांच्या अडचणीत वाढतील; पण मुख्यमंत्री...’

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मंत्री अनिल पाटील अथवा त्यांचे कुणी प्रवक्ते आहेत, ते जी विधाने करत आहेत, त्यामुळे अजितदादा अडचणीत जरूर येतील. पण, मुख्यमंत्री बनणार नाहीत. त्यांच्या अडचणीत जरूर वाढ होईल, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला. (Sanjay Shirsat's Implicit Warning on Ajit Dada's Chief Ministership)

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ‘अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत, अशी दिल्लीश्वरांची इच्छा आहे’ असे वक्तव्य केले आहे. त्यासंदर्भात आमदार शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी हा इशारा दिला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री (Chief Minister) बदलाबाबत राज्यात जी चर्चा सुरू आहे, तशी वस्तुस्थिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकुटुंब भेटायला गेले होते. त्या भेटीत कोणतेही राजकीय बोलणं अथवा घडामोडी झालेल्या नाहीत. आमचे विरोधक हा कयास लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विरोधक हे ‘मुख्यमंत्री शिंदे यांची खुर्ची धोक्यात आहे, त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आणि कुठेतरी अजितदादांचं बॅनर दाखवणार,’ असे करत आहेत. पण, असं काही नाही. एकनाथ शिंदे हे आगामी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाला आपले बाजू मांडण्यासाठी नोटिशा पाठवल्या आहेत, हे खरे आहे. आम्ही आमची बाजू अध्यक्षांसमोर ठेवली आहे. तसेच, आमचे वकिलही त्याबाबत त्यांना माहिती देत आहेत. आता आम्ही मांडलेल्या बाजूंवर विचार करून निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला स्वीकारावा लागेल, अशी कबुलीही संजय शिरसाट यांनी दिली.

आमदार शिरसाट म्हणाले की, आमची बाजू मजबूत आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची आम्हाला भीती नाही. ज्यांची बाजू कमकुवत आहे, त्यांना भीती आहे. आमच्या बाजूने निकाल येईल, अशी आम्हाला खात्री आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT