Ekanath Shinde Shiv sena Sarkarnama
मुंबई

Shivsena News : शिंदेंच्या मंत्र्यासमोरच बॉडीगार्ड-पोलिसांत राडा; नेमकं काय घडलं...

Bodyguard Police Scuffle News : बॉडीगार्डचा धक्का त्याठिकाणी बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागला.

Sachin Waghmare

Mumbai News : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुरुवारी बैठक बोलवली होती. ही बैठक संपल्यावर या ठिकाणी उपस्थित असलेला बॉडीगार्ड बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या नागरिकांना दूर करीत होता. त्याचवेळी या बॉडीगार्डचा धक्का त्याठिकाणी बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागला. या बॉडीगार्डचा हात पोलीस कर्मचाऱ्याला लागल्याने दोघांत चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहवयास मिळाले.

मुक्तागिरी बंगल्याजवळ घडलेली ही घटना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या समोरच घडली. यावेळी मंत्री पाटील यांनी या वादात मध्यस्थी केली. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचारी व बॉडीगार्डची समजूत काढत या वादावर पडदा टाकला. त्यामुळे हा वाद चिघळला नाही.

मंत्री व आमदारांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड व पोलीस यांची नियुक्ती केली जाते. मात्र, गुरुवारी दुपारी एका बैठकीनंतर नागरिकांना बाजूला करीत असताना बॉडीगार्डच्या हाताचा धक्का त्याठिकाणी उपस्थित असलेलया पोलीस अधिकाऱ्याला लागला. त्यामुळे पोलीस कर्मचारी बॉडीगार्डवर चांगलाच भडकला. याच कारणावरून दोघांमध्ये झटापट झाल्याचेही पाहावयास मिळाले.

दरम्यान, हा संपूर्ण घटनाक्रम मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोरच घडला. त्यावेळी पाटील यांनी या वादात मध्यस्थी करीत त्यांनी दोघांची समजूत काढत या वादावर पडदा टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT