Saif Ali Khan Attack : सैफवर जीवघेणा हल्ला; राऊतांचा PM मोदींसह फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, "त्यामुळेच बीड ते मुंबईपर्यंत..."

Sanjay Raut on Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीने सैफवर चाकूने सहा वार केल्याची माहिती आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्याला मध्यरात्री लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Devendra Fadnavis, Narendra Modi, Saif Ali Khan, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Narendra Modi, Saif Ali Khan, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Jan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीने सैफवर चाकूने सहा वार केल्याची माहिती आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्याला मध्यरात्री लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यासह मुंबईतील (Mumbai) कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच आता शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, सरकार सभा, निवडणुका आणि स्वागत समारंभात गुंतलं आहे. त्यामुळेच बीड ते मुंबईपर्यंत आणि चांदा ते बांधा कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाले तो मोठा कलाकार आहे. पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत होते, त्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार, असा टोला यावेळी राऊतांनी लगावला.

शिवाय पंतप्रधान मुंबईत आले तरी राज्यात सध्या काय सुरू आहे याचा विचार गृहमंत्र्यांनी करावा. आम्ही काही बोललं की त्यांना वेदना होतात. पण राज्यात सामान्य जनता सुरक्षित नाही, रस्तावर झोपड्यात बँकांमध्ये दरोडेखोर घुसत आहेत. मोठमोठ्या कलाकारांना सुरक्षा असातना त्यांच्या घरात चोर घुसत आहेत.

Devendra Fadnavis, Narendra Modi, Saif Ali Khan, Sanjay Raut
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर चाकू हल्ला; काँग्रेस खासदार पोलिसांसह सरकावर भडकल्या, "कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे..."

तर सैफवर हल्ला होणं हा मोदींना धक्का आहे. कारण नुकतंच काही दिवांपूर्वी तो सहकुटुंब पंतप्रधानांना भेटायला गेला होता. यावेळी मोदींनी एक तास त्यांच्यासोबत व्यथित केला होता. त्यानंतर त्याच्यावर हल्ला कोणी केला का केला? हा पुढचा प्रश्न आहे.

Devendra Fadnavis, Narendra Modi, Saif Ali Khan, Sanjay Raut
Walmik Karad : वाल्मिक कराडचं थेट अमेरिका कनेक्शन? जप्त केलेल्या मोबाईलमुळे धक्कादायक माहिती आली समोर

मात्र, राज्यात कोणीही सुरक्षित नाही, महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालं आहे हे गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. राज्यातील 90 टक्के पोलिस सुरक्षा महायुतीच्या फुटलेल्या आमदाराच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. राज्यात कोणाच्याही मनात कायद्याची भीती उरली नसून सरकार पु्न्हा एकदा उघडं पडलं असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com