BMC News_Laxmi Bhatia-Phalke 
मुंबई

BMC News: खळबळजनक! मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार रुपये चोरले! सीसीटीव्ही नसल्यानं कोणी केला हात साफ?

BMC News: मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, पण याच महापालिकेत दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Amit Ujagare

BMC News: मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात चोरीची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. एका महिला नगरसेविकेच्या पर्समधून तब्बल रोख २०,००० रुपये चोरीला गेल्यानं महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचं उघड झालं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत नगरसेवकांच्या वैयक्तिक वस्तूच सुरक्षित राहत नसतील तर सामान्य नागरिकांची सुरक्षा तर लांबच असा आरोप संबंधित नगरसेविकेनं केला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात चोरीची घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया-फाळके यांच्या बॅगेतून वीस हजार रुपयांची चोरी झाली आहे. जेवणाची वेळ झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभागृहात आपल्या वस्तू ठेवून नगरसेवक मंडळी ही दररोजच एकत्र जेवायला जातात. आजही जेवणाच्या सुट्टीदरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. लक्ष्मी भाटीया-फाळके यांच्या पर्समधील वीस हजार रुपयांचे बंडल काढून नेल्याचं निदर्शनास आलं आहे. कारण चोरी करणाऱ्यानं पर्समधील इतर समान बाहेर टाकलं होतं, तर पर्समध्ये पैसेच नव्हते.

दरम्यान, भाटिया यांनी यासंदर्भात महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली आहे. या चोरीचा तपास पालिकेच्या यंत्रणेकडून करण्यात येत आहे. पण स्थायी समिती सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पैसे कोणी घेतले? हे शोधणे अवघड बनलं आहे. सार्वजनिक ठिकाण असलेल्या आणि नगरसेवक नेहमीच आपल्या वैयक्तिक वस्तू ठेवत असल्यानं सीसीटीव्ही ही सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक बाब असताना ते नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण आता रितसर पोलिसांमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचं यावेळी नगरसेविका लक्ष्मी भाटिया-फाळके यांनी सांगितलं आहे.

महापालिकेत नगरसेविकेची पर्सच सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य नागरिकांच्या वस्तू किंवा महत्वाची कागदपत्रे देखील कसे सुरक्षित असतील असा खडा सवाल नगरसेविका भाटिया यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT