Joke on DCM: उपमुख्यमंत्र्यांवर केला विनोद! प्रसिद्ध कॉमेडियनच्या अटकेसाठी पोलीस हैद्राबादेतून पोहोचले प्रयागराजमध्ये; काय आहे प्रकरण?

Deputy Chief Minister Pawan Kalyan: महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गितातून टीका केल्याप्रकरणी प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आला होता.
Anudeep_Pawan Kalyan
Anudeep_Pawan KalyanSarkarnama
Published on
Updated on

Joke on DCM: महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गितातून टीका केल्याप्रकरणी प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आला होता होता. त्याच्याविरोधात सध्या विधानपरिषदेत हक्कभंग समितीसमोर सुनावणी सुरु आहे. यानंतर असाच एक प्रकार आता आंध्र प्रदेशात घडला आहे. त्यामुळं इथले स्थानिक पोलीस एका कॉमेडियनच्या अटकेसाठी थेट हैदराबादहून उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं पोहोचले आहेत. याप्रकरामुळं स्टँड अप कॉमेडियन मंडळींच्या अभिव्यक्तीवर मात्र मर्यादा यायला लागल्या आहेत.

Anudeep_Pawan Kalyan
Nashik school enrollment scam : विशेष पटपडताळणीत 'गोलमाल'! माजी विद्यार्थ्यांना वर्गात बोलवून विद्यार्थी संख्या दाखविण्याचा 'प्रताप'

नेमका विषय काय?

अनुदीप कतिकाला हा हैदराबादमधील एक स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याला आंध्र प्रदेश पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून अटक केली. आपल्या वडिलांसोबत पायी फिरण्यासाठी गेलेला असताना सार्वजनिक ठिकाणाहूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अनुदीप हा हैदराबादमध्ये राहतो तर त्याचे कुटुंबीय हे प्रयागराज इथंले रहिवासी आहेत.

अनुदीप कतिकाला याच्यावरोधात जनसेना पार्टीच्या एका नेत्यानं पोलिसांत तक्रार दिली होती की, "या स्टँडअप कॉमेडियननं जनसेना पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केली होती. हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा अनुदीपा कटिकाला याच्या एका शोमधील कार्यक्रमाच्या व्हिडिओची एक क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाली. यामध्ये त्यानं पवन कल्याण आणि निहारिका कोनिडेला यांच्या खासगी जीवनाचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर अभिनेता राम चरण याच्या आर्थिक स्थितीची तुलना त्याची पत्नी उपासना कोनिडेलाशी केल्यानं युजर्सनं अनुदीपवा धारेवर धरलं आहे.

Anudeep_Pawan Kalyan
Trump vs China : भारतापासून अवघ्या 150 किमीवर असलेल्या सामुद्रधुनीवर ट्रम्प यांचा डोळा : चीनच्या कोंडीसाठी अमेरिकेने केला मोठा करार

या व्हिडिओमध्ये, अनुदीपनं म्हटलं की, "अभिनेता राम चरण हा खरा 'स्त्रीवादी' (feminist) आहे. कारण आपली पत्नी उपासना ही आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत असूनही, राम चरणला त्याबद्दल कोणताही न्यूनगंड वाटत नाही." यानंतर पुढे घटस्फोटावर भाष्य करताना त्यानं अभिनेता अन् उपमुख्यमंत्री पवन कल्याण याचं उदाहरण देताना म्हटलं की, "घटस्फोटाच्या बाबतीत लोकांनी पवन कल्याणकडून धडा घ्यायला हवा, कारण त्याच्या दोन्ही माजी पत्नींनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या छळाचा आरोप केलेला नाही"

अनुदीपवर भडकले पवन कल्याणचे चाहते

अनुदीपच्या या टिप्पण्यांवर सोशल मीडियातून तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरनं म्हटलं की, "स्टँडअप कॉमेडीच्या नावावर तुम्ही तेलगू अभिनेत्यांवर व्यक्तिगत टिप्पण्या कशा करु शकता?" दुसऱ्या एकानं म्हटलं की, "हे उपमुख्यमंत्री किंवा इतर गोष्टीच्या बाबतीतचही होऊ नये. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर कॉमेडी करणं हे एक बकवास काम आहे. असं करणारे हे निकामटेकडे लोक आहेत. " तर आणखी एका युजरनं कॉमेडीसाठी बंधन निश्चित करण्याची गरज व्यक्त केल आहे. "प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी जीवनातील मुद्द्यांवर कॉमेडी करणे आणि त्यावर हसणे हे आपला विकास आणि करियरही धोक्यात आणू शकतं," असं त्यानं म्हटलं आहे.

Anudeep_Pawan Kalyan
Hottest city Maharashtra : महाराष्ट्रातील 'या' शहराने तोडले जगातील उष्णतेचे रेकॉर्ड; आकडा पाहून थक्क व्हाल!

चित्रपट क्षेत्रातून प्रतिक्रिया

१२३ तेलुगु वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या माहितीनुसार, चित्रपट क्षेत्रातील लोकांनीही कॉमेडियननं जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसंच यावरुन आता विरोध वाढतच चालला असून टीका या बाबीवर केंद्रीत आहे की, खासगी जीवनाला सार्वजनिक हास्याचा विषय बनवता कामा नये. दरम्यान, अटक होण्यापूर्वी, अनुदीप कटिकाला यानं या वादावर स्पष्टीकरण दिलं. त्यानं म्हटलं की, "आपल्या विनोदांमागे कोणालाही दुखावण्याचा उद्देश नव्हता, तर घटस्फोट ही बाब एक सामान्य गोष्ट असल्याचे रुजविण्याचा आपला प्रयत्न होता"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com