Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Maharashtra Cabinet Expansion: खातेबदलावरुन शिंदे गट बसला अडून; देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांकडून मनधरणीचे प्रयत्न

Devendra Fadnavis, Ajit Pawar News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईत बैठकांचा धडाका

महेश जगताप

Eknath Shinde News : रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार एक ते दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खातेबद्दल होत असल्याने मंत्र्यांनी तीव्र नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. आम्ही कोणत्याही परस्थितीमध्ये बदल स्वीकारणार नाही, अशा शब्दांत मंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सूनवल्याचे समजते.

याच पार्श्वभूमीवर गेली तीन दिवस मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यात मंत्रीमंडळविस्तारात होणाऱ्या खाते वाटपावरून चालू आसलेल्या चर्चेत शिंदे अडून बसल्याची व फडणवीस, पवार यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु असल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटातील काही मंत्र्यांची महत्वाची खाती अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्यात येणार आहेत. काही मंत्र्यांना मंत्रिपदाचा करावा लागणारा त्याग व खातेबदलामुळे काही मंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुहर्तावर अस्वस्थता पसरली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांना अर्थखाते देण्यात येत असल्याने शिंदे गटाच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे पवार यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटातील मंत्र्यांचा आणि आमदारांचा विरोध आहे.

आपला नंबर लागेल या आशेने शिंदे गटासोबत भाजपाचे (BJP) नेतेही देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत आपला नंबर लागेल की नाही, याची आता कोणालाही खात्री वाटत नाही. त्यामुळे आता किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री करायचे हे कठीण गणित शिंदे, फडणवीस, पवार यांना सोडवावे लागणार आहे.

आठ दिवस झाले तरीही राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना खाते मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला, तर खऱ्या अर्थाने या सरकारची ती तारेवरची कसरत ठरेल. तिघे कसा तोल सांभाळतील हे त्यातून दिसेल. त्याचबरोबर विद्यमान मंत्र्यांची मंत्रिपद, खातेबदल करतांना त्यांची नाराजी कशी हाताळली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT