Sharad Pawar Upcoming Meetings: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी शरद पवारांनी घातले लक्ष!

Sharad Pawar Will Take District Wise Meetings: उद्यापासून मुंबईत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर सर्वच आमदार अजित पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे संघटनात्मक विस्तारासाठी पक्षाला खुप काम करावे लागणार आहे. त्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच लक्ष घातले आहे. त्यांच्या सुचनेनुसार स्थानिक पदाधिकारी नाशिक जिल्हा पिंजून काढतील. (NCP planing to expand it`s organisation base in Nashik)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) संघटनात्मक विस्तारासाठी मोठे पाऊल टाकण्यात आले आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन कानमंत्र दिला आहे. त्यानुसार पदाधिकारी जिल्हा पिंजून काढतील.

Sharad Pawar
NCP Crisis Impact : जेव्हा आमदार कोकाटे कंत्राटदारांसह ‘पीडब्ल्यूडी’मध्ये जातात!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा उद्यापासून बैठकाचा धडाका सुरू होणार आहे. यासंदर्भात पहिली बैठक उद्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. त्र्यंबकेश्वरचे दर्शन देऊन शरद पवार गट पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात करणार आहेत. त्र्यंबकेश्वरनंतर पेठ, हरसूल, सुरगाणा, कळवण अशा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठका घेणार आहेत.

पक्षाकडून जिल्ह्यात आढावा घेतला जात आहे. सध्या कोण कोणाच्या बाजूने आहे, याचा सर्व्हे सुरू आहे. शरद पवार यांच्यासोबत जे आहेत त्यांची तालुकानिहाय यादी केली जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनंतर पदाधिकारी लागले कामाला आहेत.

Sharad Pawar
Maharashtra Politics: राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी अजितदादांची संपर्क मोहीम?

विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकारी नियुक्त करण्याच्या शरद पवारांच्या सूचना आहेत. येवल्यातील शरद पवारांच्या सभेनंतर पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. युवकांना पक्षाकडे जास्तीत जास्त आकर्षीत करून त्याचे मतदानात रूपांतर करण्यासाठी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मुबंईत बोलावून विविध सूचना केल्या जात आहेत. येवल्यातील सभेनंतर मुबंईतून खास रणनिती आखली जाते आहे. नाशिक जिल्ह्याची रणनीती प्रामुख्याने ग्रामीण भागात तसेच सध्या पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघांसाठी आहे. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com