Mumbai News : अखेर ठरलं! १२ जानेवारीला पंतप्रधान महाराष्ट्रात असून दोन मोठ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. यातील पहिला कार्यक्रम आहे तो मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा समुद्रपुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समुद्रपुलाची पाहणी करून आढावा घेतला.
शिवडी-न्हावाशेवा समुद्रपुलाला 'अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' असे नाव दिले आहे. या पुलामुळे राज्याच्या अर्थकारणाला वेग मिळणार आहे. मुंबईला थेट रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याशी जोडणारा अटल सेतू २१.८ किमीचा असून २७ मीटर रुंद आहे. भारतातील सर्वात लांब असा हा समुद्रपूल असून आतापर्यंत कधीही न वापरलेल्या तंत्राचा या पुलाच्या बांधकामासाठी वापर केला आहे. त्यामुळे या पुलाच्या उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या वापरासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे
मुंबई ते नवी मुंबई हे अंतर दोन तासांचे आहे. मात्र, अटल सेतूमुळे हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. शिवाय वाहतुकीचा गोंधळ नसेल. उरणमधील जेएनपीटी बंदर, शिवाय कोकणात मुंबईत येण्यासाठी अटल सेतू झाल्यामुळे वाशी खाडीपुलावरून येणाऱ्या वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. याचा मोठा दिलासा मुंबईकरांना आणि वाहनचालकांना मिळणार आहे.
नवी मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईजवळ होणारी तिसरी मुंबई, यामुळे नवी मुंबईची भविष्यात मोठी वाढ होणार आहे. त्याला शिवडी-न्हावाशेवा समुद्रपुलाची मोठी साथ मिळणार आहे. शिवाय नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांसाठी अटल सेतू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या पुलासाठी MMRDA ने पुढाकार घेतला. हा पूल स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना आहे. २१.८ किलोमीटरच्या पुलापैकी १६.५ किलोमीटर लांबीचा पूल प्रत्यक्षात समुद्रात आहे. या पुलासाठी ५०० बोइंग विमाने आणि १७ आयफेल टॉवर यांच्या वजनाएवढ्या लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा समुद्रसेतू आहे. या अटल सेतूमुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर जवळजवळ १५ किलोमीटरने कमी झाले आहे.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.