Office-bearers of the Revenue Association submitting a memorandum to District Collector Kisan Javale against the arrest action. sarkarnama
मुंबई

Land Acquisition Scam : शहापूर औद्योगिक जमीन संपादनात आर्थिक गैरव्यवहार; मंडल अधिकारी, जमीन मालकाला अटक

Shahapur Industrial Land : आरोपींमध्ये तलाठी सतीश भानुदास ढवले, रिना किसन पाटील उर्फ रिना साईराज येलमकर आणि व्यवहारातील एजंट तथा मध्यस्थ कुमार नारायण बैंकर यांचा समावेश आहे.

महेंद्र दुसर

Land Scam : विस्तारीत शहापूर (ता. अलिबाग) येथील औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या जमीन भूसंपादन प्रक्रियेत आणि नुकसानभरपाई वाटपात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव (चरी) आणि मूळ जमीनधारक रितेश किसन पाटील यांना शुक्रवार(ता.24)अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये तलाठी सतीश भानुदास ढवले, रिना किसन पाटील उर्फ रिना साईराज येलमकर आणि व्यवहारातील एजंट तथा मध्यस्थ कुमार नारायण बैंकर यांचा समावेश आहे. भूसंपादन प्रक्रियेदरम्यान चुकीच्या व्यक्तीला तब्बल ४३ लाख १५ हजार ३८ रुपयांची नुकसानभरपाई अदा करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे महसूल विभागातील कामकाज आणि नुकसानभरपाई वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, ही कारवाई संपूर्ण वस्तुस्थितीची सखोल चौकशी न करता करण्यात आल्याचा दावा महसूल कर्मचाऱ्यांनी केला आहे. चुकीच्या मालकाला नुकसानभरपाई मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मंडळ अधिकाऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आज निदर्शने करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. आज महसूल, तलाठी कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नेमका घोटाळा काय आहे?

मुंबई येथील व्यावसायिक किशोर रतिलाल शाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मौजे शहापूर येथील सर्व्हे नं. ४१४/१, ४१४/३, ४२८/४/अ आणि ४२८/४/ब या जमिनीचे मूळ मालक रितेश किसन पाटील, रिना किसन पाटील व सुमन किसन पाटील यांच्याकडून रितसर साठेखत आणि खरेदीखत केले होते. या खरेदी व्यवहारासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून रितसर परवानगीही घेण्यात आली होती. परंतु, ही जमीन विस्तारीत शहापूर औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी संपादित केली जात असताना, महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मूळ खरेदीदाराचे (किशोर शाह) नाव फेरफार नोंदींमधून डावलले किंवा रद्द केले.

बेकायदेशीर मोबदला वाटप

तक्रारदाराचे नाव फेरफारमधून कमी करून, मृत व्यक्ती व मूळ खातेदारांच्या नावे संगनमताने ४३ लाख १५ हजार ०३८ इतका भूसंपादनाचा मोबदला अनधिकृतपणे वितरित करण्यात आला.

मयत व्यक्तीचे (सुमन पाटील) नाव ७/१२ उताऱ्यावर नोंदवून आणि सरकारी नोंदींमध्ये दिशाभूल करणारे फेरबदल करून शासनाचा व खाजगी व्यक्तीचा आर्थिक अपहार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT