Crime News Sarkarnama
मुंबई

Shahapur Crime: धक्कादायक: सरपंच देशमुख हत्येनंतर आणखी एका माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; पाय तोडले...

Ajnup Gram Panchayat Former Sarpanch kadam ughade attacked: मारहाणीत त्यांचे दोन्ही पाय तुटल्याने उपचारासाठी त्यांना प्रथम शहापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Mangesh Mahale

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला झाला असून यात त्यांचे पाय तोडले आहेत. शहापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत.

शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत चार चाकी गाडी फोडत बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

या मारहाणीत त्यांचे दोन्ही पाय तुटल्याने उपचारासाठी त्यांना प्रथम शहापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोन्ही पाय तुटल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कल्याण येथे पाठवण्यात आले आहे. अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे हे आपल्या कामानिमित्ताने घरून कार घेऊन आज सकाळी 10 वाजता निघाले होते.

अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाजवळ आल्यावर काही अज्ञात व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. कारवर दगडांचा मारा केला. कदम उघडा यांना गाडी बाहेर काढत मारहाण केली.

या मारहाणीत त्यांच्या दोन पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी पाय तुटल्याचे सांगितले. यामुळे पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे.याबाबत पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT