
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवाराला घेऊन जात असलेल्या वाहनावर दगडफेक झाल्याने पाळधीमध्ये मंगळवारी रात्री दोन गटात राडा झाला. चालकाने हॉर्न वाजवल्याच्या अन् कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाला. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आमने-सामने आल्याने राडा झाला. दोन्ही गटात बाचाबाची झाल्याने संतप्त जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. या घटनेत एक गाडी आणि सुमारे १० ते १२ दुकाने जाळली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू होता.
या कारमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती मिळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली अन् परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आता पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आवरण्यासाठी पोलिस खात्याने विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अवैध शस्त्रांची जप्ती करणे आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी नोव्हेंबर अखेर 100 पिस्तूल व रिवॅाल्वर जप्त केली आहेत. जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र ठेवणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या अशा 98 आरोपींकडून 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डर असलेल्या लहान उमर्टी व मोठ्या उमर्टी या ठिकाणी अवैध शस्त्र निर्माण करण्याचे काम होते. याच ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील चोपडा मार्गे, यावल मार्गे अशा विविध मार्गाने अवैध शस्त्रांची आवकजावक होत असल्याची जाणकारांची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.