Shalini Thackeray criticized Devendra Fadnavis  sarkarnama
मुंबई

MNS Politics : राजकीय गुन्हेगारांचा आश्रयदाता 'देवाभाऊ', मनसेने 'ती' सगळी प्रकरणं सांगितली; शालिनी ठाकरे आक्रमक

Shalini Thackeray criticized Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय गुन्हेगारांवर कारवाई केली नाही, असा आरोप मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

Roshan More

Shalini Thackeray News : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची अडचण वाढेल अशी पुण्यातील दोन जमीनची प्रकरणे पुढे आली. या जमीन व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. तसेच फलटणमध्ये डाॅक्टर महिल्याच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

मागील काही काळात घडलेल्या काही प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात काय कारवाई केली, असे प्रश्न विचारले आहेत. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी राजकीय गुन्हेगारांचा आश्रयदाता 'देवाभाऊ', असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

शालिनी ठाकरे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंडवरून संतोष देशमुख, मेघा इंजिनिअरींग, जैन बोर्डिंग व्यवहार, महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरण आणि पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट केले आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, 'बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी, वाल्मिक कराड आणि साथीदारांना अटक झाली. मात्र वाल्मिक कराडचे आका असलेल्या धनंजय मुंडेची साधी चौकशीही झाली नाही.'

'6 हजार कोटींच्या कामाचं टेंडर एलएनटीने कमी बजेट देऊनसुद्धा चढ्या भावात सरकारने मेघा इंजिनिअरींगला १४ हजार कोटींना दिले. कोटनि हस्तक्षेप करुन व्यवहार रद्द केला. पण कारवाई कोणावर झाली नाही. (मेघा इंजिनिअरींग भाजपला पैसे देते), ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला. कोणावरही करवाई नाही.', असा आरोप शालिनी ठाकरे यांनी केला.

'पुण्यातील जैन बोर्डिंगची जागा केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २०० कोटी रुपयांना लाटण्याचा प्रयन केला. व्यवहार रह... मोहोळांवर कोणतीही कारवाई नाही. फलटणमधील महिला डाॅक्टरच्या आत्महत्येप्रकरणी तिने तिच्या हातावर आत्महत्येचं कारण लिहीलेलं असताना भाजप खासदार निंबाळकरांवर कोणतीही कारवाई नाही, साधी चौकशी नाही.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

'पुण्यातल्या १४०० कोटींची महार वतनाची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्या मुलाने पार्थ पवारने ३०० कोटींना लाटण्याचा प्रयन केला. अधिकारी आणि पार्टनर्स वर गुन्हा नोंद झाला, पण पार्थ पवारांवर कारवाई नाही.', असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT