Maharashtra Politics : 'हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे लढणारा नेता नाही शिवसेना संपवून टाका; भाजप अन् संघाच्या बैठकीत रचला होता कट...' घोसाळकरांचा गौप्यस्फोट

Vinod Ghosalkar Allegation om BJP and RSS : 'पक्षात असणारी धुसफूस त्यावेळी लक्षात येत होती, पण शिवसेना एक कुटुंब आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना नको तेवढे स्वातंत्र्य देण्याची गरज नव्हती, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तर भाजपबरोबर जुळवून घेण्याचा विषयच नव्हता. कारण 2017 मध्ये त्यांनीच अचानक युती तोडली.'
Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Vinod Ghosalkar alleged that BJP and RSS conspired to dismantle Shiv Sena after Balasaheb Thackeray’s death a claim reigniting the Maharashtra political debate.Sarkarnama
Published on
Updated on

Vinod Ghosalkar Allegation : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कट रचला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला आहे.

त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नवा राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 'सकाळ' कार्यालयात 'सकाळ संवाद' या उपक्रमात बोलत असताना घोसाळकर यांनी हा गौप्यस्फोट केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीत बैठक झाली होती. त्यात यापुढे हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे लढणारा नेता नाही त्यामुळे शिवसेना संपवून टाका, असा कट रचला गेला होता. याची माहिती त्यांच्याच लोकांनी आम्हाला दिली होती.'

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Pune BJP : पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी भाजपमध्ये 1000 इच्छुक, उमेदवारी निश्चितीसाठी अशी लागणार कात्री, 50 टक्के दिग्गजांचे पत्ते कट होणार

शिवाय पक्षात असणारी धुसफूस त्यावेळी लक्षात येत होती, पण शिवसेना एक कुटुंब आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना नको तेवढे स्वातंत्र्य देण्याची गरज नव्हती, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तर भाजपबरोबर जुळवून घेण्याचा विषयच नव्हता. कारण 2017 मध्ये त्यांनीच अचानक युती तोडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकहाती 53 आमदार निवडून आणले. मुंबई महापालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक आले म्हणून भाजपला आमच्याबरोबर तडजोड करावी लागली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपवून टाकण्याचा कट दिल्लीत रचला गेला. ही माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली, त्यामुळे विषाची परीक्षा कशाला घ्यायची? म्हणून भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याचंही त्यानी यावेळी सांगितलं.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Narayan Rane Video : नारायण राणेंच्या इशाऱ्यानंतर उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले, 'तर आम्ही स्वबळावर...'

शिवाय भाजपला हिंदू मतांमध्ये विभागणी नको आहे, त्यामुळे ते शिवसेना संपवायला निघालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांच्या आदेशावरूनच शिंदेंना बळ देण्यात आल्याचा आरोपही घोसाळकर यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री काय बोलतात याचा ताळमेळ नाही.

अनेक प्रकरणांत फडणवीस स्वतःच क्लीन चिट देत आहेत. तुम्ही म्हणजे काय न्यायालय आहात का? असा सवाल करत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी अनेक गुंडांना तुरुंगातून बाहेर काढलं आणि आता तेच गुंड धिंगाणा घालत आहेत. शिंदेंना संपविण्यासाठी त्यांच्या निर्णयांना स्थगिती दिली जात असल्याचा दावाही घोसाळकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com