Shankar Patole caught accepting ₹25 lakh bribe in unauthorized shops case, arrested by Anti-Corruption Bureau. sarkarnama
मुंबई

Thane News : 10 लाख दिले पण हाव कमी होईना, 25 लाखांसाठी तकादा; उपायुक्त अलगत जाळ्यात सापडला! शंकर पोटोळेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी समोर!

Shankar Patole Arrested : ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला लाच घेताना अतिक्रमण विभागाच्या प्रमुखाला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Shankar Patole News : अनधिकृत बांधकामांवरून ठाणे पालिकेला व अतिक्रमण विभागाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. आता त्याचा विभागातील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच घेताना मुंबई लाचलुचपत विभागाने अटक केली. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला सर्व अधिकारी कार्यक्रमाता व्यग्र असताना ही घटना घडली. मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी लाच स्वीकारताना त्यांना रंगहाथ पकडण्यात आले.

आता नेमकी कारवाई नेमकी का झाली? कोणत्या प्रकरणात लाच मागितली होती? याची इनसाईट स्टोरी समोर आली आहे. ठाण्यातील घंटाळी येथील विकासकाने जी जागा घेतली होती. त्या जागेत तीन गाळे होते. ते गाळे काढून देण्यासाठीच पाटोळे यांनी लाच मागितली गेली असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबईतील बिल्डरने घंटाळी भागात एक जागा घेतली होती. त्या जागेत तीन गाळे आहेत. हे तीनही गाळे एकाच मालकाचे असल्याची माहिती आहे. हे गाळेधारक जागा रिकामी करीत नसल्याने विकासकाने अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती. हे गाळे काढून द्यावेत अशी मागणी बिल्डरने पाटोळे यांच्याकडे केली होती.

त्यानुसार पहिल्या टप्यात या कारवाईसाठी पटोळेंना 10 लाख देण्यात आले होते. परंतु पैसे दिल्यानंतरही गाळे हटविण्यात न आल्याने बिल्डर काहीसा हैराण झाला होता. त्याने यासाठी वारंवार पाटोळे यांच्याकडे विचारणा केली. दरम्यान, 10 लाख दिल्यानंतर आणखी पैशांची मागणी पाटोळे यांनी बिल्डरकडे केली होती.

पाटोळे अडकले जाळ्यात

त्यानुसार पालिकेच्या वर्धापन दिनाचा मुहुर्त साधत पाटोळे यांनी महापालिका मुख्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमात व्यग्र असताना बिल्डरकडे पैसे घेऊन येण्यास पाटोळेंनी तकादा लावला होता. अखेर सांयकाळी ५.३० च्या सुमारास बिल्डर पैसे घेऊन आला, मात्र पाटोळे हे पैसे घेत असताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.

गाळेधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

घंटाळी भागात विकासकाच्या जागेवर असलेले तीन गाळे हे मागील कित्येक वर्षापासून त्याठिकाणी आहेत. मात्र मागील काही वर्षापूर्वी येथे रस्ता रुंदीकरण झाले आणि रस्त्यात त्यांची अर्धी जागा गेली होती. त्यानंतर महापालिकेने त्यांचे पुनर्वसन करुन देतो, असे सांगितले होते. मात्र त्यांचे देखील पुर्नवसन अद्याप पर्यंत झाले नव्हते. आधी पुनर्वसन करा मगच जागा खाली करतो अशी मागणी देखील गाळेधारकाने केली असल्यची माहिती पालिकेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT