Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये माजी खासदार सुजय विखे आणि विद्यमान खासदार नीलेश लंके यांच्यात काँटे की टक्कर झाली. आरोप-प्रत्यारोपांनी नगरमध्ये चांगलाच धुरळा उडाला होता.
त्यावेळी विखे पाटील यांनी लंकेंना इंग्रजी भाषेवरून हिणवले होते. त्याला संसदेत थेट इंग्रजीतून शपथ घेऊनच लंकेंनी उत्तर दिले आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आनंद व्यक्त करत विखेंना टोला लगावला आहे.
18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे. यात महाराष्ट्रातील शिंदे गट, अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गटांच्या खासदारांनी मराठीत शपथ घेतली. तर नीलेश लंकेंनी Nilesh Lanke मात्र थेट इंग्रजीतून शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खासदरकीची शपथ घेतल्यानंतर लंकेंनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हातही जोडले. त्यांच्या शपथेची राज्यभर चर्चा सुरू आहे.
याबाबत शरद पवारांनी Sharad Pawar आनंद आहे म्हणत सुजय विखेंना टोला लगावला. ते म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे. तिथे मराठीच काय कोणत्याही भाषेत बोलता येते. तेथे प्रत्येक भाषेचे भाषांतर केले जाते. त्यामुळे एखादी जन माणसांत काम करणारी व्यक्ती देशाच्या संसदेत जात असेल आणि तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्याचे नीलेशने उत्तर दिले याचा आम्हाला आनंद आहे.
नेमकं काय झालं?
लोकसभा निवडणुकीत नगरमधील महायुतीच्या एका मेळाव्यात डॉ. सुजय विखे-पाटील यांनी, मी जेवढे इंग्रजी बोलतो, तेवढे समोरच्या उमेदवाराने, किमान पाठ करून तरी सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही, असा टोला लगावत नीलेश लंकेंना हिणवले होते. त्यानंतर खासदार झालेल्या नीलेश लंकेंनी सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून संसदेत इंग्रजीतून शपथ घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.