sharad Pawar, Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शक्य नसेल, तर शब्द देऊ नये; जरांगेंच्या उपोषणावरून पवारांनी राज्य सरकारला घेरलं

Sachin Fulpagare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला घेरलं आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवाद साधला, पण प्रत्यक्ष काय बोलणं झालं? आपल्याला माहिती नाही. पण वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानुसार जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. ती आणखी वाढवली होती. आणि त्या कालावधीत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असा विश्वास जरांगे यांना देण्यात आला होता. पण त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. जे करणं शक्य नसेल तर असा शब्द कधीही देऊ नये. पण जरांगे पाटील यांना शब्द देण्यात आला आहे, असं प्राथमिक माहितीतून दिसून येतंय. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन केलेल्या शिंदे समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचं वृत्त एका वृत्तपत्रात म्हटलं आहे.

शरद पवार गटाची उद्या बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची उद्या बैठक होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होणार आहे. शरद पवार गटाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. एकीकडे आमदार रोहित पवार यांची राज्यात युवा संघर्ष यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांनीही तयारी सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT