Maratha Reservation : मराठा, धनगर आरक्षणावरून महाराष्ट्रात भडका; पण मोदींची बुचकळ्यात टाकणारी 'चुप्पी'!

PM Modi On Maharashtra Tour : पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. मराठा आणि धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते...
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Visit Shirdi In Maharashtra : मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. फक्त मराठा समाजच नव्हे तर धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. आणि सर्वांचे लक्ष ते काय बोलतात याकडे होते, पण पंतप्रधान मोदींनी आरक्षणावर चकार शब्दही काढला नाही. पंतप्रधान मोदींचे हे मौन अपेक्षा बाळगून असलेल्या सर्वांना कोड्यात टाकणारे आहे.

PM Modi
Modi in Shirdi : मोदींना मराठ्यांची गरज राहिली नाही; उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांचा संताप

छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणारच, अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात घेतली. यातून मराठा समाजाला विश्वास देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

आणि मराठा समाजात आशा निर्माण झाली. दुसरीकडे, आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या शिर्डी भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत असताना शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. एवढचं काय तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी 'मोदी गो बॅक' चा नारा देत ठिकठिकाणी आंदोलनही केलं. यामुळे मोदींच्या शिर्डी दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष होतं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना आणि लोकप्रतिनिधीना ठिकठिकाणी होत असलेली गावबंदी, उंच टॉवरवर चढून आंदोलन आणि तरुणांच्या होत असलेल्या आत्महत्या यामुळे मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

यामुळे मराठा समाजातील हा रोष कमी करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी शिर्डी दौऱ्यात करतील अशी अपेक्षा होती. पंतप्रधान मोदी शिर्डीतील कार्यक्रमात मराठा आरक्षणावर बोलतील, अशी आशा निर्माण झाली होती.

फक्त मराठा समाजाचेच नाही तर राज्यात धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी काय बोलणार? याची उत्सुकता होती. पण पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणावरून चकार शब्दही काढला नाही. यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याकडे डोळे लावून बसलेल्या मराठा समाजासह धनगर समाजाचीही निराशा झाली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता राज्य आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागणार आहे, अन्यथा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना या समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

PM Modi
Attack on Gunaratna Sadavarte Vehicle : मराठा आरक्षणासाठी आधी स्वतःची कार पेटवली, आता सदावर्तेंची फोडली; कोण आहे मंगेश साबळे ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com