Manoj Jarange Patil PC : मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ अधिवेशन भरवा; जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Manoj Jarange Patil PC : "मराठ्याच्या मनात काही पाप नव्हतं..."
Manoj Jarange Patil PC
Manoj Jarange Patil PCSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil PC : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषण आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. मराठ्यांची पोरं मोठे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी षडयंत्र रचल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच, राजकीय नेत्यांना मराठा समाजाने केलेल्या गावबंदीबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil PC
Manoj Jarange Patil : मराठ्यांची पोरं मोठं होऊ नये म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र..; जरांगेंचा गंभीर आरोप !

जरांगे पाटील म्हणाले, "आमदार - खासदार - मंत्री यांनी गावात फिरण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक विशेष अधिवेशन घ्यावे. मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ सभागृहात एक विशेष अधिवेशन भरवून मराठा समाजाला आरक्षण तातडीने मिळवून द्यावे, त्यामुळे गावागावांत न फिरता विधानभवनात अधिवेशन भरवा आणि विधानभवनात जा, अशी मागणी जरांगेंनी केली.

पंतप्रधान मोदींना गोरगरिबांची गरज नाही -

"पंतप्रधान जाणीवपूर्वक आरक्षणावर बोलले नाहीत का? एक तर हा विषय त्यांना सांगितलं गेलं नसेल. किंवा त्यांनी सोयीस्करपणे आरक्षण हा विषय टाळला. त्यांना गरिबांची गरज राहिली नसेल. असा त्यातून अर्थ निघतोय. पण त्यांनी विषय घेतला नसला तरी मराठ्यांना काही फरक पडत नाही, पण पंतप्रधान हा विषय घेतील असे मराठ्यांना वाटलं होतं, पण मराठ्याच्या मनात काही पाप नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात वाईट भावना असती, तर मराठ्यांनी त्याचं विमान उतरू दिलं नसतं. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हा विषय नक्की हाताळतील अशी आशा होती, पण आता त्यांना गोरगरिबांची गरज राहिली नाही, असेही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil PC
Modi in Shirdi : मोदींना मराठ्यांची गरज राहिली नाही; उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांचा संताप

मराठ्यांची पोरं मोठे होऊ नयेत म्हणून षडयंत्र -

त्यांनी आमच्याकडून ३० दिवसांचा वेळ मागितला होता, आम्ही ४० दिवसांचा दिला. यांना आरक्षण देणं होणार नव्हतं तर वेळ नव्हता घ्यायला पाहिजे. यांनी ५० वर्षांचा वेळ मागितला पाहिजे होता. मराठ्यांची पोरं मोठं होऊ नयेत, म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलंय, अशी शंका मराठा समाजाच्या मनात आहे, असे जरांगे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com