Ajit Pawar On PM Post : Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On PM Post : शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी होती पण, काँग्रेसने.. ; अजित पवारांचा सर्वात मोठा खुलासा!

Ajit Pawar On Sharad Pawar PM Post : "..म्हणून पी. व्ही. नरसिंह रावांच्या सरकारमध्ये शरद पवारांना संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. "

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भाजपप्रणित 'एनडीए'आघाडीच्या खासदारांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पंतप्रधान पदाबाबत भाष्य केले होते. काँग्रेस पक्षाने शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी दिली नाही, असा जाहीर आरोप मोदींनी या बैठकीत केला होता. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) याबाबत प्रतिक्रिया देत मोदींनी केलेल्या आरोपाला दुजोरा दिला आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधानांनी केलेल्या या आरोपावर विचारले असता अजित पवार म्हणाले,"त्यावेळेस राज्यात ४८ जागांपैकी आम्ही ३८ खासदार निवडून आलो. त्यानंतर आमच्यात अंतर्गत मतदान झालं होतं. आम्ही सर्वांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. त्यावेळेस इतर राज्यातल्या बहुतांश काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानपदासाठी पी. व्ही. नरसिंह राव यांना पाठिंबा दिला. म्हणून पीवी नरसिंह रावांच्या सरकारमध्ये शरद पवारांना संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. शरद पवारांना पंतप्रधानपदाचे प्रसंग दोन तीन वेळा आले होते. यात जे यश मिळायला हवे होते, ते यश दुर्दैवाने मिळालेली नाही."

अजित पवार पुढे म्हणाले, मोदींनी त्याचं मत मांडलं आहे. मोठ्या नेत्यांच्या बोलण्यावर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी बोलणे योग्य नाही. खरंतर व्यक्तिगतरित्या अनेकदा शरद पवारांना अनेकदा पंतप्रधानपदाची संधी चालून आली होती . १९९१ या वर्षी मला बारामतीतून लोकसभेला तिकीट मिळाले होते. मी खासदार झालो होतो. राज्यातल्या सर्व ३८ खासदार यांनी पवारांनीच पंतप्रधान व्हावं, अशी मागणी केली होती. किंतु ते पूर्ण झालीच नाही."

मोदींनी काय केला होता आरोप ?

"भाजपा हा काही काँग्रेससारखा अहंकार असलेला पक्ष नाही. काँग्रेस पक्षाच्या घराणेशाही आधारीत राजकारणामुळेच शरद पवार यांना न कधीही देशाचे पंतप्रधानपदावर येऊ दिले नाही," असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT