FIR On MLA Prakash Surve Son: शिवसेना शिंदे गटातील आमदाराच्या मुलावर अपहरणाचा गुन्हा

Mumbai Crime News: व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण
Raj Prakash Surve
Raj Prakash SurveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व परिसरातून बुधवारी एका व्यापारी राजकुमार सिंह यांचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुर्वे याच्यासह १०-१५ जणांवर गुन्हे दाखल केला आहे. त्यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केल्याचा आरोप आहे. (Latest Political News)

Raj Prakash Surve
Sanjay Raut On Flying Kiss : राहुल गांधींनी 'फ्लाईंग किस' दिला तर त्यात काय झालं? राऊतांनी केलं समर्थन !

मुंबईतील गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयात काही लोक घुसले आणि म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणी एक सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज समोर आले आहे. यात १० ते १५ लोक कर्मचार्‍यांना शिवीगाळ करताना आणि एका व्यक्तीला जबरदस्तीने सोबत नेताना दिसत आहेत.

Raj Prakash Surve
Raghunathdada Patil On Bachchu Kadu: आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले, ते राज्यमंत्रीच राहिले; त्यांनी त्यांची किंमत..

राजकुमार सिंह यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना त्यांच्या कार्यालयातून जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. यानंतर पाटणा येथील मनोज मिश्रा यांना दिलेल्या व्यावसायिक कर्जाची पुर्तता करण्यासाठी त्यांच्यावर बंदुकीच्या जोरावर दबाव आणण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, राजकुमार सिंग यांना दहिसर येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेले. तेथे आमदाराचा मुलगा राज सुर्वे आणि त्यांच्या माणसांनी बंदुकीच्या जोरावर हे प्रकरण मिटवण्याची आणि त्याबद्दल कोणाशीही न बोलण्याची धमकी दिली.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या घटनेवरून शिंदे गटाचा समाचार घेतला. “देशद्रोही टोळीचे नवरत्न,” असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रकाश सुर्वे आणि इतर आमदारांवर टीका केली आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात खडाजंगी रंगणार असल्याचे दिसत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com