Maan Political News : छावणींच्या अनुदानावरुन गोरे, देशमुखांमध्ये श्रेयवाद; नेमका पाठपुरावा कोणाचा..?

Drougt In Maan 2018 मध्ये खरीप हंगामात दुष्काळजन्य पारिस्थिती निर्माण झाली होती. शासनाने याकाळात दुष्काळ जाहीर केला. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या.
Ranjitsinh Deshmukh, Jaykumar Gore
Ranjitsinh Deshmukh, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

-अय्याज मुल्ला

Maan, Khatav Political News : खटाव, माण तालुक्यात २०१८ मध्ये युती शासनाच्या काळा सुरू केलेल्या चारा छावण्यांचे पाच कोटी 35 लाख 28 हजार 728 रुपयांचे प्रलंबित अनुदान पुन्हा भाजप, शिवसेना युतीच्या सरकारने मंजूर केले आहे. याबाबत भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख या दोघांनीही आपण पाठपुरावा केल्यामुळे हे अनुदान मिळाल्याचे सांगितले आहे. या दोघांकडून श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरु असलेतरी, अनुदान प्राप्त झाल्यामुळे दोन्ही तालुक्यात मात्र, समाधानाचे वातावरण आहे.

2018 मध्ये खरीप हंगामात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. शासनाने या काळात दुष्काळ जाहीर केला. सातारा Satara politics जिल्ह्यातील माण ,खटाव तालुक्यात Khatav, Maan जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. दोन्ही तालुक्यातील विविध सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांची जनावरे जगली पाहिजेत या हेतूने चारा छावण्या सुरू केल्या होत्या.

संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयाचे भाग भांडवल गुंतवले होते. यादरम्यान वेळेत अनुदान न मिळून देखील चारा छावण्या व्यवस्थीतरित्या सुरु होत्या. माण , खटाव तालुक्यातील चारा छावण्यांचे एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीतील 5 कोटी 35 लाख 28 हजार 728 रुपये इतके अनुदान प्रलंबीत होते. हे अनुदान लांबणीवर पडत असल्याने चारा छावणी धारकांत असंतोष निर्माण झाला होता .

याबाबत अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी सातत्याने आंदोलने करून पाठपुरावा केला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या प्रयत्नातून अनुदान प्राप्त झालेआहे. श्री. देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांचेकडे याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला होता. शिवाय छावणी चालक व शेतकऱ्यांना सोबत घेऊन श्री. देशमुख यांनी सातत्याने विविध आंदोलने केली होती. माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन थकीत अनुदानाबाबत लेखी पत्र दिले होते.

Ranjitsinh Deshmukh, Jaykumar Gore
Maan Khatav News: माण-खटावमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस आक्रमक...

तर माजी मंत्री श्री. जानकर यांनी याबाबत विधान परिषदेत आवाज उठवला होता. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडून थकीत चारा छावणी अनुदान निधी वितरीत करण्याचे आदेश काल (सोमवारी ता. 7) जारी करण्यात आले. यामुळे खटाव - माण तालुक्यातील चारा छावणी धारकांतून समाधान व्यक्त होत आहे. श्री. देशमुख यांनी थकीत चारा छावणी अनुदानासाठी उभारलेल्या लढ्याला व पाठपुराव्याला यश प्राप्त झाले.

छावण्यांचे पाच कोटी ३५ लाख २८ हजारांची प्रलंबित देयके मिळावीत यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी पाठपुरावा केला होता. आमदार गोरेंच्या यांच्या प्रयत्नानांना यश मिळाल्याची माहिती डॉ.अजीत दडस यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. डॉ.दडस म्हणाले, २०१८ - १९ मधील दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी शासनाकडून चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यातील सुरुवातीची काही देयके चारा छावणी चालकांना अदा करण्यात आली होती.

Ranjitsinh Deshmukh, Jaykumar Gore
Maan BJP News : माण, खटावला उरमोडी, तारळीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा....

उर्वरित देयके प्रलंबित ठेवण्यात आली होती. देयके न मिळाल्याने छावणी चालक अडचणीत आले होते. आमदार जयकुमार गोरे यांनी स्थानिक स्तरावर प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठपुरावा केला होता. मदत व पुनर्वसन आयुक्तांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत पत्र दिले होते.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवताना माण - खटावच्या आमदार महोदयांच्या मागणीचा उल्लेख केला होता. मंत्रालयीन स्तरावरही आ. गोरेंनी पाठपुरावा केल्याने शासनाने छावण्यांची सदर प्रलंबीत देयके अदा करण्याचे आदेश मिळाले आहेत.त्यामुळे माणखटावच्या छावणीचालकाकडून शासनाचे व आ.जयकुमार गोरे यांचे आभार मानले जात असल्याचेही डॉ.अजीत दडस यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Ranjitsinh Deshmukh, Jaykumar Gore
Satara Medical College News : खासदार उदयनराजेंच्या पाठपुराव्याला यश; मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com