Devendra Fadnavis- Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis On Sharad Pawar : '' पवारांनी मला नाहीतर त्यांच्या पुतण्यालाच 'क्लिन बोल्ड' केलंय ; पण...''; फडणवीसांचा तिखट पलटवार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना पवारांनी आमच्यासोबत डबलगेम केला असं म्हटलं होतं. त्यावेळी पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी पाठ फिरवत डबलगेम केला असं फडणवीस म्हणाले होते.

त्यावर शरद पवार यांनी आपण टाकलेल्या गुगलीवर फडणवीस यांची विकेट पडली असं शरद पवार म्हणाले. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)नी गुरुवारी (दि.२९) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे की, पवारसाहेबांना सत्य सांगावं लागलं. मला असं वाटतंय, मी काही जी गुगली टाकलीय, त्यात सध्या तरी त्यांनी सत्य बाहेर आलं आहे.

पण ते अर्धच सत्य बाहेर आलं. त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच क्लिन बोल्ड केलं आहे. पण ठीक आहे. लवकरच माझ्या आणखी एका गुगलीनं लवकरच पूर्ण सत्य बाहेर येईल. आणि तेही त्यांचे पुतणे अजित पवारच बोलतील असा पलटवार फडणवीसांनी पवारांच्या टीकेवर केला आहे.

फडणवीस काय म्हणाले, नरेंद्र मोदीं(Narendra Modi)नी उसाची एफआरपी वाढवली. महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकर्यांना होणार आहे. युक्रेन आणि रशियाच्या युध्दामुळे जगभरात युरियाचे दर तीन ते चार आणि पाच पटीने वाढले आहेत. मोदींनी ३ लाख १६ हजार कोटींच्या अनुदान जाहीर केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून जगभरात युरियाचे दर कितीही वाढले तरी महाराष्ट्र, देशातल्या शेतकऱ्याला वाढीव दरात युरिया विकत घ्यावा लागणार नाही. त्यांना आहे त्याच दरात युरिया विकत घेता येईल.

शरद पवार काय म्हटलंय..?

“देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरीय. त्यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.

...तर ते सरकार दोन दिवसच का राहिलं ?

शरद पवारां(Sharad Pawar)नी फडणवीसांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. पवार म्हणाले, आमचा त्यांना पाठिंबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे असाही टोला पवार यांनी लगावला.

(Edited By DeepaK Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT