Sharad Pawar on PM Modi:...म्हणून पंतप्रधान मोदींची अस्वस्थता वाढली; शरद पवारांचा खोचक टोला

Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेला शरद पवारांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

NCP News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपानंतर आता शरद पवार यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. तसेच विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता वैयक्तिक टीका करणं सुरू केलं आहे, असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, "विरोधकांनी घेतलेल्या बैठकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थता वाढली आहे. विरोधक एकत्र आल्यामुळे मोदी सध्या वैयक्तिक टीका करत आहेत. सध्या देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही".

"यामध्ये कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, हिमाचल, झारखंड, उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू यासह बहुसंख्य राज्यात भाजपची सत्ता नाही. तर गोवा आणि महाराष्ट्रात आमदार फोडून भाजपने सत्ता आणली. यामुळे आगामी निवडणुका पाहाता मोदींची अस्वस्थता वाढत आहे", अशी खोचक टीका करत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar on PM Modi: शरद पवारांनी मुद्यांसह मोदींच्या आरोपांची केली चिरफाड; म्हणाले...

याबरोबरच सध्याची देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता पुढच्या वर्षी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचंही विधानही यावेळी त्यांनी केलं. ते पुढे बोलताना म्हणाले, "देशातील आगामी निवडणुकांमध्ये काय होईल, याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय असे विधाने केले आहेत", असंही ते म्हणाले.

Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar Breaking News : शरद पवारांची मोठी मागणी, म्हणाले,'' आम्ही महिलांना महानगरपालिकेपर्यंतच आरक्षण देऊ शकलो, पण आता...''

मोदींनी राष्ट्रवादींवर केलेल्या आरोपांवर पवार काय म्हणाले?

"राष्ट्रवादीबद्दल ते म्हणाले होते शरद पवारांच्या मुलीला पुढे न्यायचे असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला मत द्या. हे खरं आहे की, माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर तीन वेळेस लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आली. एखाद्या वेळी कुटुंबाची पुण्याई उपयोगी पडते. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीत नाही. सुप्रिया सुळे यांची संसदेच्या कामगिरीत 98 ते 99 टक्के उपस्थिती असते".

"संसदेत प्रश्न विचारण्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे. संसदेतील चांगल्या कामगिरीचा अभ्यास करुन खासदारांना पुरस्कार देण्यात येतो. सुप्रिया सुळे यांना हा पुरस्कार आठ वेळेला मिळाला आहे. त्यामुळं मोदी काहीही म्हटले तरी स्वतःचं कर्तृत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमीच मतं देत नाहीत", अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींना प्रतिउत्तर दिलं.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com