Sharad Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्याचं मोठं विधान; म्हणाला, ‘देवाभाऊ भावनिक...'

NCP Leader Statement: बीड,लातूर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात पूरस्थितीनं शेतकरी आणि नागरिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. या नुकसानग्रस्त भागांतील नागरिकांना आर्थिक मदत दिली जावी, म्हणून विरोधकांकडून फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरू असतानाच मोठा दबाव टाकला जात आहे. यात शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे नेतेमंडळीही आघाडीवर आहेत.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्यात मुसळधार पावसानं धुमाकुळ घातला आहे. बीड,लातूर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात पूरस्थितीनं शेतकरी आणि नागरिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. या नुकसानग्रस्त भागांतील नागरिकांना आर्थिक मदत दिली जावी,म्हणून विरोधकांकडून फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरू असतानाच मोठा दबाव टाकला जात आहे. यात शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेमंडळीही आघाडीवर आहेत. अशातच आता शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या विधानांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी कामगार मेळाव्यात यांना भावनिक साद घातली आहे.

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कामगार मेळाव्यात ‘देवाभाऊ भावनिक आहेत’, असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी माथाडी कामगारांच्या घराबाबत मुख्यमंत्र्यांनी भावनिकपणे निर्णय घ्यावा,अशी जोरदार मागणी उचलून धरली आहे.

प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले, फडणवीस यांचं मन फार हळवं आहे. माथाडी कामगारांसाठी एक दिवस द्यावा आणि निर्णयाची अंमलबजावणी करावी. आमचे प्रश्न फार काही नसल्याचंही त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी आण्णासाहेब पाटलांनी केलेला कायदा जिवंत राहावा. यशवंतराव चव्हाण यांच्यासह सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर लक्ष दिले. आज काही गोष्टी बदलल्या आहेत. आज आमचे देवाभाऊ जाताना काहीतरी पदरात देतील, अशी आम्हाला अपेक्षाही शिंदे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, माथाडी कामगार कायदा आणि घरांबाबत निर्णय घ्या.हा प्रश्न तुमच्यासाठी क्षुल्लक आहे, आपण निर्णय घ्यावेत हीच इच्छा आहे. आम्ही विरोधक असलो, तरी तुम्ही प्रेमाने घेतात. ‘आता पक्ष आणि तेवढ्याच संघटना निघतात, हे आमचे जुने कार्यकर्ते आहेत. संघटनेची ताकद मोठी आहेत.अशात अण्णासाहेब पाटील यांची संघटना मजबूत ठेवा, असं आवाहनही शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना केलं आहे.

शशिकांत शिंदेंनी यावेळी कामगारांच्या घरांचा प्रश्न असून निकष पाहून काय देता येईल हे पाहावं अशी मागणी केली. वडाळा आणि कांजूरच्या घरांबाबत निर्णय घ्यावा. इकडे सिडकोचे काम सुरू आहे. त्याबाबत आम्ही आंदोलन केले होते. सभागृहात आम्ही विषय मांडले होते.त्याकडेही लक्ष घालून आम्हाला दिलासा द्यावा,असंही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हटलं.

राज्यात ज्या नेत्यानं माथाडी कामगार आणला, त्याच नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक वर्ष या नेत्यांच्या अपरोक्ष कामगारांच्या एकजुटीवर काम करत आलो आहे.पण आजही माथाडी कामगारांचा कामगार हा अण्णासाहेब पाटील या एकाच देवाला पूजतो. बाकीचे लोक केवळ फोटो लावतात, असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी या कार्यक्रमात लगावला.

मागच्या सरकारांमध्ये जसा कामगारांच्या प्रश्नाला आधार मिळायचा, तसाच आधार आताही मिळावा. आजचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांचा आश्वासनांचा नाही, तर पूर्ततेचा राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी शिंदेंनी यावेळी बोलून दाखवला.

शशिकांत शिंदे यांनी यावेळी मराठवाड्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटावरही भाष्य करताना माथाडी कामगारांना मदतीचं आवाहन केलं. ते म्हणाले, या देशावर, राज्यावर संकट आल्यावर माथाडी कामगार उभा राहिला आहे. अख्या महाराष्ट्रातील माथाडी कामगार यावेळी मदत करणार आहेत. एक दिवसाचा पगार आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिंदे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT