मुंबई

NCP Replied PM Modi : कृषिमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ? मोदींच्या टीकेला राष्ट्रवादीने यादीच दिली

अनुराधा धावडे

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल शिर्डीतील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर, शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी कोणते निर्णय घेतले, याची यादीच दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. "२००४ साली देशात अन्नधान्याची टंचाई होती. मात्र शरद पवार साहेबांनी केंद्रीय कृषिमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित केले आणि अन्नधान्य, डाळींच्या हमीभावात भरीव वाढ करून धान्य उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण बनवलं!

"शेती व शेतीशी निगडीत इतर उत्पादनांकडे लक्ष देऊन शरद पवार साहेबांनी विशेष योजना राबवल्या. जेणेकरून या उत्पादनात देश अग्रेसर झाला आणि आयात करणारा देश पवार साहेबांमुळे निर्यातदार बनला." असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.

तसेच, पूर्व भारतातील शेतक-यांना भात पीक उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचं कामही शरद पवार साहेबांनी केले. यासाठी विविध महत्वाकांक्षी योजना राबवल्या.परिणामी मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पादन झाले. शरद पवार साहेबांनी पूर्व भारतात हरितक्रांती आणून संपूर्ण देशातील दुसरी हरितक्रांती यशस्वी करून दाखवली!" असेही राष्ट्रवादीने आपल्या ट्विटमध्य म्हटले आहे.

शनिवारी (ता.२८) खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील भाजप सरकारने शरद पवार यांना दिलेल्या एका पुरस्काराची आठवण करुन दिली. ‘शेती आणि राजकीय’ क्षेत्रातील योगदानासाठी मोदी सरकारने शरद पवारांना पद्मविभूषणने सन्मानित केले होते, अशी आठवण काल सुप्रिया सुळेंनी सांगत भाजपला प्रत्युत्तर दिले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर शरद पवारांवर नेहमी टीका करतात. मोदींचे महाराष्ट्रात स्वागत आहे. त्यांनी महाराष्ट्रात येऊ पवारांवर टीकाही करावी.पण आपले एक नाणे आहे आणि तेही मार्केटमध्ये खणखणीत चालते,असा टोलाही लगावला होता.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT