Mumbai : आमदार अपात्रतेच्या याचिकांबाबतच्या हालचाली वाढल्या असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यासोबत सल्लामसलत करण्यासाठी नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे. आठ दिवसात दुसऱ्यांदा नार्वेकर हे मेहता यांच्या भेटीस जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुनावणीच्या नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करत त्यांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर न केल्यास आम्ही दिलेले वेळापत्रक स्वीकारावे लागेल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
लवकरच निर्णय देईन
या भेटीबाबत नार्वेकर म्हणाले, "आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणारआहे. हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे.राष्ट्रवादीच्या आठ आमदाराना नोटीस ही अपात्रते बाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झालेली आहे. त्यानुसार नोटीसा दिलेल्या आहेत. वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन,"
विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणीला हिवाळी अधिवेशनानंतरच शक्यता आहे. ठाकरे गटाकडून आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांना दोनदा पत्र देऊन सुद्धा प्रत्यक्षात आतापर्यंत कुठलीही पाऊले उचलली गेलेली नाहीत. विधान परिषदेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी हिवाळी अधिवेशन पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.