Thane Ncp News Sarkarnama
मुंबई

Thane Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महापालिका आयुक्तांना साकडे

Pankaj Rodekar

Thane Municipal Corporation Budget :

सद्यःस्थितीत देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा स्थितीत ठाणे महानगरपालिकेकडून आगामी अर्थसंकल्पात करवाढ केल्यास महागाईने पिचलेल्या ठाणेकरांचे अक्षरशः कंबरडेच मोडेल. त्यामुळे अर्थसंकल्पात करवाढ करू नये, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेस Sharad Pawar या पक्षाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना घातले आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार, उपाध्यक्ष संजीव दत्त्ता, रोहिदास पाटील, राजेश साटम, संदीप यादव, फिरोज पठाण, संदीप पवार  यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे. ठाणेकर नागरिकही या महागाईच्या फेऱ्यातून सुटलेले नाहीत. कोरोनानंतर अनेकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. उत्पन्नाला मर्यादा आलेल्या असताना महागाई मात्र अमर्याद वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नव्याने करवाढ झाली तर सामान्य ठाणेकरांचे कंबरडे मोडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लवकरच ठाणे महानगर पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तथा अर्थसंकल्प मांडले जाणार आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक गणित बिघडलेले असले तरी आजमितीला करवाढ केल्यास ते ठाणेकरांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात मालमत्ता, पाणी आदी करांमध्ये तसेच टीएमटीच्या तिकीट दरांमध्ये वाढ करू नये, अशा मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, आयुक्तांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे, असे सुहास देसाई यांनी सांगितले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT