Sharad Pawar Resigns As NCP Chief : Supriya Sule News  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Resigns As NCP Chief : सुप्रिया सुळेंच्या भविष्यवाणीतला पहिला भूकंप आज झाला, दुसरा कधी होणार?

Supriya Sule News : दुसरा राजकीय भूकंप दिल्लीत घडणार?

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Resigns As NCP Chief : महाराष्ट्रातल्या राजकारणात आज सर्वात मोठी घडामोड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे अनेक नेते भावूक झाले, पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी याचना केली.

कार्यकर्त्यांच्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी दोन ते तीन दिवसांपर्यंत या निर्णयावर विचार विनिमय करणार असल्याचे समजते, असा शरद पवार यांचा सांगावा असल्याचे विरोधी पक्षनेते अजित यांनी जाहीर केले. एकीकडे शरद पवार यांच्या या निर्णयाची चर्चा होत असताना, दुसरीकडे खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काही दिवसांपूर्वीच एक खळबळजनक विधान केले होते. आता सुळे यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

सात आठ दिवसांपूर्वीच अजित पवार हे भाजपसोबत संधान बांधणार असल्याची चर्चांना उधाण आले होते. माध्यमात अशा चर्चा झळकत होत्या. याच दरम्यान सुप्रिया सुळे येत्या १५ दिवसात दोन राजकीय स्फोट होणार असल्याचे दावा केले होता. यातील एक स्फोट महाराष्ट्रात तर दुसरा स्फोट दिल्लीच्या राजकारणात होईल, असा दावा सुळे यांनी केला होता.

सुळे यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांचा एक वक्तव्य तंतोतंत खरे ठरले आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घोषित केले आहे. ही आज राजकारणातली सर्वात मोठी घडामोड होती. यातील एक दावा खरा झाला आहे. आता दुसरा राजकीय स्फोट कधी होणार याची चर्चा सुरू झाला आहे.

आता दुसरा राजकीय स्फोट काय असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरा राजकीय स्फोट कधी होणार याची उत्सुकता आहे. पहिला स्फोट राज्याच्या राजकारणातून आज घडून आला. दुसरा राजकीय स्फोट दिल्लीच्या राजकारणातून घडणार असल्याचे सुळे म्हणाल्या होत्या. दरम्यान हा स्फोट शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत असू शकतो, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT