Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

India Alliance News: मोदी सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी मुंबई ठरणार 'गेम चेंजर'? पवारांनी सांगितली रणनीती

Maharashtra Politics: 'इंडिया' आघाडीची मुंबईत लवकरच महत्वाची बैठक पार पडणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: देशातील महत्वाच्या राजकीय पक्षांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला पार पडणार आहे. या बैठकीच्या तयारीचा आढावा राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे.

मोदी सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधक प्रयत्न करत असून आता मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात मुंबई 'गेम चेंजर' ठरणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत असतानाच मुंबईत होणाऱ्या बैठकीत आगामी रणनीती ठरणार असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले.

'इंडिया'च्या या बैठकीत नेमकं काय चर्चा होणार, मोदी सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधक काय रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शरद पवार यांनी 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसंदर्भात बोलताना मुंबईत होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

"मुंबईत होणाऱ्या बैठकीचे आयोजन मी स्वत:(शरद पवार), उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी केले आहे. दोन बैठका याआधी झाल्या आहेत. आता काही प्रश्न घेऊन चर्चा करायची गरज आहे. त्यामुळे मुंबईतील बैठक महत्त्वाची असून या बैठकीत प्राथमिक अजेंडा ठरवण्यात येणार आहे. या बैठकीसाठी 30 ते 40 नेते एकत्र येतील", असे पवारांनी सांगितले.

"'इंडिया' आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सत्ताधारी फोडाफोडी करत आहेत, हे लोकांना पसंत पडत नाही. सर्वसामान्य जनता मतदानाच्या वेळी योग्य निर्णय घेतील", असंही पवार म्हणाले. विरोधी पक्षाच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेत या संदर्भात चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT