Solapur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शनिवारी पुण्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या भेटी दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित असल्याचे बोलले जाते.
या भेटीसंदर्भात आता शरद पवार यांनी स्वत:च मोठा खुलासा केला आहे. "अजित पवार हे माझे पुतणे असून कुटुंबातील व्यक्तीने भेटण्यात गैर काय? ", अशी प्रतिक्रिया सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.
शनिवारी पुण्यातील चांदणी चौकातील कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. तर दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटील हे देखील पुण्यात होते. कोरेगाव पार्क येथे अजित पवार, शरद पवार व जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा शनिवारपासून होती. याबद्दल आता शरद पवारांनी प्रतिक्रिया देत ही भेट गुप्त नव्हती, असे स्पष्टीकरण दिले आहे.
"राष्ट्रवादी पक्ष कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसून माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही", असेही पवारांनी सांगितले. याचवेळी मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीवर देखील पवारांनी भाष्य केले. "पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत 'इंडिया'ची बैठक होत असून या बैठकीत पुढील रणनीती ठरणार आहे", असेही पवार म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.