Amit Zanak-Sunil Raut-Bapusaheb Pathare  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget Session : पवार, ठाकरेंच्या आमदारांसह आठ जणांवर विधानसभा अध्यक्षांनी दिली महत्वाची जबाबदारी

Maharashtra Political News : अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून (ता. 03 मार्च) 26मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशना 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत, तर राज्यमंत्री हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 03 March : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (ता. ०३ मार्च) मुंबईत सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे लक्ष्य असणार याची झलक दाखवून दिली. मात्र, विधानसभेचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आठ आमदारांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे, त्यात सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदारांनाही संधी देण्यात आली आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session) सुरू झाले. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून (ता. 03 मार्च) 26 मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशना 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत, तर राज्यमंत्री हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे तब्बल 23 दिवस चालणार आहे, त्यामुळे हे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतील आठ आमदारांवर तालिका अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली आहे. विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) नार्वेकर हे ज्यावेळी उपलब्ध नसतील, त्या वेळी हे तालिका अध्यक्ष विधानभेचे कामकाज पाहणार आहेत.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून भाजपच्या तीन आमदारांना तालिका अध्यक्ष म्हणून निवडले आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पाच पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराला विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

तालिका अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर यांचा, तर शिवसेनेचे रमेश बोरनारे, राष्ट्रवादीचे दिलीप बनकर, काँग्रेसचे अमित झनक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे, तर ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनील राऊत यांना विधानसभेचे कामकाज तालिका अध्यक्ष म्हणून पाहता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT