Jitendra Awhad-Rajesh Tope-Sharad Pawar-Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad Election Result : विधान परिषदेतील पराभवाची पवार घेणार झाडाझडती; आव्हाडांना ‘सिल्व्हर ओक’वरून भेटीचा सांगावा

Jayant Patil Defeat : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषद निवडणुकीचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आले होते.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 13 July : विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तातडीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना सिल्व्हर ओक येथे बोलावून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव नेमका कोणत्या कारणांमुळे याची माहिती पवार हे आव्हाड यांच्याकडून घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) विधान परिषद निवडणुकीचे (Vidhan Parishad Election) नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे देण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांना राष्ट्रवादीच्या आमदारांची सर्व मते मिळणे अपेक्षित होते. मात्र, तेही मिळालेली दिसत नाहीत, त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मते फुटल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

जयंत पाटील यांना पहिल्या फेरीत केवळ १२ मते मिळाली आहेत. वास्तविक शरद पवार यांच्या पक्षाची १२ आणि शेकापचे एक आमदार अशी तेरा मते मिळणे अपेक्षित होते. मात्र, तीही मते जयंत पाटील यांना मिळालेली नाहीत. तसेच जयंत पाटील यांनी डावी आघाडी आणि इतर पक्षांची सात मते मिळविल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांना पहिल्या पसंतीची २० मते मिळणे अपेक्षित होते. मात्र, जयंत पाटील यांना केवळ १२ मते मिळाली आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीकडून पराभवाची कारणे शोधली जात आहेत.

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना बोलावलं आहे. सिव्हर ओक येथे आज सकाळी दहाच्या सुमारास भेटीसाठी आव्हाड जाणार आहेत. शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव नेमका का, झाला याची माहिती शरद पवार घेणार आहेत.

जयंत पाटील यांच्या मतदानाच्या नियोजनाची जबाबदारी शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे सोपवली होती. पाटील यांच्या पराभवानंतर आता शरद पवार प्रत्यक्षात माहिती घेणार आहेत. कदाचित या भेटीच्या वेळी जयंत पाटीलही उपस्थितीत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT