Sharad Pawar & IND vs Pakistan Match Latest News  Sarkarnama
मुंबई

IND vs PAK Asia Cup : भारताच्या विजयानंतर शरद पवारांच्या सेलिब्रेशनची होतेय चर्चा

IND vs PAK| Sharad Pawar : शरद पवार यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आशिया चषकामध्ये खेळला गेलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्याचा विविध क्षेत्रातील अनेक क्रिकेट चाहत्यांनी आनंद घेतला आणि विजयानंतर अनेकांनी त्याच सेलिब्रेशन देखील केलं आहे. मात्र, क्रिकेटप्रेमी असलेले राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील हा सामना बघितला आणि विजयानंतर त्यांनी केलेलं खास सेलिब्रेशन केलं आहे. त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ मात्र समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.(Sharad Pawar & IND vs Pakistan Match Latest News)

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पुन्हा आपला एकदा आपल्या खेळीचा जलवा दाखवत आपण मॅचविनर असल्याचं सिद्ध केलं. टॅास जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली होती. पहिल्या काही षटकात स्विंगचा जादुगार भुवनेश्वर कुमारने भेदक मारा केला आणि पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांना वापस पाठवले. त्याला हार्दिकनेही उत्तम साथ दिली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या शॉर्ट बॉलसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी भंबेरी उडाली होती. यामुळे पाकिस्ताच्या फलंदाजांनी फक्त १४८ धावांपर्यंतच मजल मारता आली होती.

या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारताची सुरूवातही म्हणावी तशी चांगली झाली नाही भारताचा सलामीवीर फलंदाज के.एल. राहूल दुसऱ्याच बॅालवर बाद झाला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनाही काही काळ रनसाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र भारताने १४८ या लक्षाचा पाठलाग करतांना ५ विकेट्स गमावून हे पूर्ण केले. या विजयासह भारताने १० महिन्यापुर्वी झालेल्या आपल्या अपमानाचा बदलाही घेतला. पाकिस्तान संघाने २०२१ साली भारताला १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. याच पराभवाची भारताने काल परतफेड केल्याने भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला गेला. दरम्यान, देशाचे राजकीय ज्येष्ठ नेते तथा ज्यांच्याकडे एकेकाळी जगाच्या क्रिकेटचं नेतृत्व असलेले पवार यांनीही भारताच्या विजयाचं खास सेलिब्रेशन केलं आहे. भारताने सामना जिंकल्यावर त्यांनी दोन्ही हात उंचावून त्यांनी विजयी सेलिब्रेशन केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियात मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पवार यांनी आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भारत विरुद्ध पाकिस्तान सामाना बघितला. त्यांच्या साथीला मॅच पाहायला त्यांच्या नातवांची उपस्थिती व्हिडिओमध्ये दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय आणि सुप्रिया यांच्या कन्या रेवती यांनी आपल्या आजोबांशेजारी बसून सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. जेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला तेव्हा पवार यांनी आपले दोन्ही हात उंचावत विजयाचं सेलिब्रेशन केलं. खासदार सुळे यांनी या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT